Add

Add

0
                            प्रलोभनांना बळी पडू नका : अजित पवार 

पुणे(प्रतिनिधी):-'आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सर्वानी एकत्र येऊन काम केले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता मिळू शकते. आपल्या पक्षाने दहा वर्षात जी कामे पुणे शहरासाठी केली आहेत ती पुणेकरांसमोर मंडली गेली पाहिजेत', असे  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी सांगितले . 
       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि खासदार , शहराध्यक्ष ऍड . वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी झाली, यावेळी  विचारमंथन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते  बोलत होते. 
   ते पुढे म्हणाले , ' प्रलोभनांना बळी पडू नका, एकमेकांबद्दल गैरसमज करू नका  तुमच्या काही अडचणी असतील तर थेट माझ्याशी बोला, ते जमत नसेल तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोला अन्यथा थेट पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्याशी बोला.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहरात बळकट करून पुन्हा एकहाती सत्ता आणण्याचे उद्दिष्ट प्रत्येकाने ठेवले  पाहिजे. 
    खासदार,शहराध्यक्ष ऍड.वंदना चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले,सोशल मीडियाचा वापर प्रभावी पणे करा आपल्या उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा. पक्षाच्या माध्यमातून केलेली कामे पुणेकरांपर्यंत प्रभावीपणे पोहचवा . पक्षाच्या जाहीरनाम्याप्रमाणे आपण केलेली कामे नागरिकांसमोर मांडा .विनम्रता , संयम , जबाबदारी  पाळा .        
        पक्षाचा जाहीरनामा कसा असावा याविषयी देखील बैठकीत चर्चा करण्यात अली. नगरसेवक , पदाधिकारी  यांची मते जाणून घेण्यात अली. या बैठकीला महापौर प्रशांत जगताप, स्थायीसमिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके , सभागृह नेते शंकर केमसे , माजी महापौर,पदाधिकारी,नगरसेवक,सेल अध्यक्ष, प्रभाग स्वीकृत सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top