Add

Add

0

पुणे : - जिल्हा परिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या सोडतीमध्ये मान्यवरांच्या जागेवर नव्याने आरक्षण पडल्याने काहींना सुखद, तर काहींना दुःखद धक्का बसला आहे. मात्र, ओबीसी गटातून निवडणूक लढविण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळविल्यास सर्वसाधारण गटातील उमेदवार ओबीसीच्या कोट्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतोे. त्यामुळे यासंबंधातील चर्चेला आतापासूनच उधाण येऊ लागले आहे.   सोडतीमध्ये जिल्ह्यातील काही मातब्बर उमेदवारांच्या जागी इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसुचित जाती (एससी), अनुसुचीत जमाती (एसटी) साठी आरक्षण पडले आहे; परंतु कुणबी प्रमाणपत्र असेल तर ओबीसीच्या गटातून निवडणूक लढवता येऊ शकते. यामुळे आपल्या जागी ओबीसीचे आरक्षण पडलेले इच्छुक उमेदवार कुणबी प्रमाणत्र मिळेल का? याची चाचपणी आत्तापासूनच सर्वसाधारण गटातील इच्छुक करु लागले आहेत.  जिल्हा परिषदेच्या मागील निवडणुकीत सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या काही उमेदवारांच्या जागेवर आरक्षण पडले आहे. त्यामुळे आरक्षित  जागेवर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच अशी सुप्त इच्छा इच्छुक उमेदवारांसह मान्यवरांनी केली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीपासूनच काही इच्छूक उमेदवारांनी याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 7, अनुसूचित जमातीसाठी 5 अशा जागा आरक्षीत झाल्या आहेत. तर ओबीसीसाठी एकुण 20 जागा आरक्षीत झाल्या आहेत, त्यापैकी 10 जागा या ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे उर्वरीत ओेबीसींच्या जागेवर सर्वसाधारण गटातील उमेदवार कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात? पुरंदर तालुक्यातील 4 पैकी 4 गट हे ओबीसीसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे या तालुक्यात एकाही सर्वसाधारण गटातील उमेदवारांना उभे राहता येणार नाही. परिणामी येथील सर्वसाधारण इच्छूक उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राची  साथ मिळु शकते. 

Post a Comment

 
Top