Add

Add

0
                                   तुळजाभवानी, माय मुळशी पुरस्काराचे शानदार वितरण ... 
पिरंगुट (प्रतिनिधी ):-''आपल्या नोकरीला सेवा समजणार्‍या दिवंगत पांडुरंग दुधाणे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा तुळजाभवानी पुरस्कार हा दुधाणे यांचे उचित स्मरण असल्याचे प्रतिपादन मुळशीतील सामूदायिक विवाहाचे प्रणेते चंद्रकांत भरेकर यांनी तुळजाभवानीव मायमुळशी पुरस्कार समारंभाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. 
जय तुळजाभवानी सेवाभावी ट्रस्ट व स्वर्गीय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठानावतीने स्वर्गीय पांडुरंग दुधाणे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा तुळजाभवानी पुरस्कराने राष्ट्रीय कुस्तीगीर तनुजा आल्हाटचा सन्मानीत करण्यात आले. www.mymulshi.com माय मुळशी वेबसाईटच्या वतीने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अशेाक काळभोर, सौ. मंदाकिनी कळमकर, ज्ञानेश्‍वर पवळे व अमीत मोहोळ यांना माय मुळशी पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी मुळशीचे सभापती महादेव कोंढरे,पिरंगुटच्या सरपंच सौ.ललिता पवळे,स्वर्गीय पांडुरंग दुधाणे प्रतिष्ठा नचे कार्याध्यक्ष संजय दुधाणे, राम गायकवाड, उमेश पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. 
पिरंगुटमधील तुळजाभवानी परिसर भक्तीमय असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भरेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणले की, या ट्रस्टने धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देत आदर्श कार्य उभे केले आहे. सत्कारार्थीच्या वतीने आय.टी. अभियंता अमित मोहोळने मनोगत व्यक्त केले. मोहोळ म्हणाले की, मुळशीचा चेहरा बदलत आहे. येत्या काळात कुस्तीपटूंच्या या तालुक्यातून अनेक आय.टी. इंजिनिअर घडतील. 
पिरंगुट येथील भवानीनगरमधील तुळजाभवानी मंदिराच्या सभामंडपात सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देेऊन चंद्रकांत भरेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. 
मायमुळशी www.mymulshi.com संकेतस्थळच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप पवार यांनी केले. प्रास्ताविक संजय दुधाणे यांनी तर आभार रामदास पवळे यांनी मानले.Post a Comment

 
Top