Add

Add

0
     
 पौड (प्रतिनिधी);-'' महाराष्ट्रात  शतकोत्तर चालत आलेली दिवाळी अंक संस्कृती,परंपरा ही व्यवसाय म्हणून पुढील काळात जोपासण्याची गरज असून दिवाळी अंकांनी संस्कृती  जपत  असताना त्याचा  व्यवसाय म्हणून विचार केला पाहिजे ,तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरत वाचकांना वाचन संस्कृतीकडे  आकर्षित केले पाहिजे. तरच दिवाळी अंकांची ही  थोर परंपरा अबाधित राहू शकेल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्यावसायिक मा. नयनशेठ बंब यांनी केले. पुणे येथून गेली 27 वर्षे  सातत्याने प्रसिद्ध होत असलेल्या ,दत्तात्रय सुर्वे संपादित "शिवतेज" या दिवाळी अंकाचे प्रकाशन मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध अश्या '"ग्रीनगेट "या रिसॉर्टमध्ये करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 
   शिवतेज च्या सत्ताविसाव्या  वर्षातील दिवाळी अंकाचे प्रकाशन 'ग्रीनगेट रिसॉर्ट" येथे अत्यंत सध्या पद्धतीने करण्यात आले.त्यावेळी शिवतेजचे संपादक,मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य ,भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे,प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नयनशेठ बंब ,युवा उद्योजक श्रेयांस बंब,शिवतेज प्रकाशनच्या व्यवस्थापिका कु.स्नेहल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. 
  शिवतेज दिवाळी अंकाचे हे सत्ताविसावे वर्ष असून अत्यंत आकर्षक स्वरूपात तो प्रकाशित अरण्यात आला आहे.मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजीमहाराज व त्यांचा मावळा मुळशी तालुक्यातील 'धनगड'किल्ल्यावर जात अस -तानाचे  दृश्य चितारण्यात आलेले आहे.सोनेरी रंगात छापलेले हे छायाचित्र वाचकांचे लक्ष वेधून घेते.शिवतेज दिवाळी अंक परंपरेनुसार छत्रपती शिवाजी राजे यांच्या जीवनातील प्रसंगाचे  आवचित्त साधून परंपरा राखण्या ची जबाबदारी सांभाळण्यात आली आहे. 
    शिवतेज दिवाळी अंकाचे वैशिष्ठ ठरावे आसा 'गुलामराजा" या बबन मिंडे यांच्या आगामी कादंबरीतील काही भाग प्रकाशनपूर्व या अंकात देण्यात आलेला आहे.मुळशी धरणग्रस्थांच्या जीवनावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'सत्याग्रही" या बबन मिंडे यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरी नंतर "गुलामराजा' हि कादंबरी प्रसिद्ध होता आहे. वाचकांना प्रतीक्षा करायला लावणाऱ्या या कादंबरीचा हा भाग नक्कीच या शिवतेज दिवाळी अंकांचे वैभव ठरणार आहे. 
  शिवतेज दिवाळी अंकात  कथा विभागात सुमारे 10 कथा असून त्यामध्ये नलिनी भोसेकर,अरुणकुमार यादव, प्रमोद रोहणकार, सौ. सुजाता निंबाळकर, चारुशीला कुलकर्णी, मृणालिनी केळकर ,विठ्ठल पवार, धोंडीरामसिंह राजपूत यांच्या कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. 
  शिवतेज दिवाळी अंक हा "सुख विशेषांक' म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुख या विषयावर 15 लेख आहेत.त्यामध्ये सुखी जीवनाचा मार्ग, हा बापट गुरुजी यांच्या लेखासोबत सौ.विशाखा कुलकर्णी,श्री .शंभू गवारे, रुपाली वारंग, विलास गावरस्कर ,गणेश शिंदे,शीतल कर्देकर,चंद्रशेखर तांदळे,सुनील ओजाळे,डॉ.आठवले यांचेही वाचनीय लेख आहेत.सुखाचे विश्लेषण त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच धीरज वाटेकर यांचा '' आध्यात्म आणि त्याचे शास्त्रीय पर्यटन "हा लेख वाचनीय ठरणार आहे. 
  शिवतेज दिवाळी अंकात काव्यतेज या कवितांच्या विभागात सुमारे वीस कवींच्या कविता आहेत. हास्यतेज या व्यंगचित्रांच्या विभागात बापू घावरे,राजेंद्र सरंग यांची व्यंगचित्रे आहेत.निर्मल सीताराम पाटील,रमेश सहस्र बुद्धे यांच्या विनोद व चारोळ्या आहेत. 
    शिवतेज दिवाळी अंकाने गेल्या सत्तावीस वर्ष्यात जवळजवळ 16 विशेष पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. या वर्षीचा अंक देखील ती परंपरा कायम राखेल आसा विश्वास संपादक दत्तात्रय सुर्वे यांनी बोलताना व्यक्त केला आहे. 

  

Post a Comment

 
Top