Add

Add

0
पिरंगुट (प्रतिनिधी):-तिरूपती (आंध्रप्रदेश)येथे होणार्‍या राष्ट्रीय धर्नुविद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात पिरंगुटच्या वेदांत संजय दुधाणे याची निवड करण्यात आली आहे. 
यवतमाळमध्ये झालेल्या राज्य धर्नुविद्या स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई करीत भारतीय धर्नुविद्या संघटनेच्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता वेदांत दुधाणें नी झेप घेतली आहे.महाराष्ट्र धर्नुविद्या संघटनेच्या पहिल्या १० वर्षांखालील रिकर्व्ह प्रकारात वेदांतने पदकांची हॅटट्रिक केली. 10 मीटर, 15 मीटर आणि संयुक्त प्रकारात वेदांतने रूपेरी पदकाचा वेध घेतला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 118 खेळाडूंनी भाग घेतला होता. 
  पुण्यात झालेल्या जिल्हा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर यवतमाळ येथील स्पर्धेत वेदांतने पदकाची कमाई केली. आता तो तिरूपती येथे 11 ते 15 नोव्हेंबर दरमान्य होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. 
पुण्यातील गोळवळकर विद्यालयात इयत्ता चौथीत वेदांत शिकत असून यापूर्वी फिल्ड अर्चरीत त्याने राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले आहे. तो अर्चरी ऍकॅडमीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजीत चामले यांच्याकडे प्रशिक्षण घेत असतो. 

Post a Comment

 
Top