Add

Add

0
                                       
पौड (प्रतिनिधी):-महाराष्ट्रातील गेन्या अनेक वर्षांपासूनची दिवाळी अंक परंपरा हि समृद्ध असून पुढील पिढीला वाचनाची आवड कायम राहावी म्हणून दिवाळी अंक संस्कृती जोपासण्याची  गरज आहे,ग्रामीण व शहरी भागातून प्रसिद्ध होणारे अंक हि खऱ्या अर्थाने साहित्य वाचनसंस्कृती  असून त्याला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे असे प्रतिपादन मुळशी तालुक्याचे नायब निवासी तहसीलदार श्री. नागेश गायकवाड यांनी केले. पुणे येथून गेली दहावर्षे प्रसिद्ध होत असलेल्या''मासिक शिवमार्ग""च्या दहाव्या वर्षातील'दसरा दिवाळी अंक -2016'चे प्रकाशन करताना ते बोलत होते. 
 पुणे येथून नियमितपणे प्रसिद्ध होणाऱ्या 'मासिक शिवमार्ग"च्या दहाव्या वर्ष्यातील दसरा-दिवाळी अंकाचे प्रकाशन निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या हस्ते अत्यंत सध्या पद्धतीने पौड येथील तहसी लदार कचेरीत करण्यात आले. याप्रसंगी मासिकाचे संपादक व मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रय सुर्वे ,पत्रकार संघ मुळशीचे कार्याध्यक्ष किसान बाणेकर ,मासिक शिवमार्गच्या व्यवस्थापिका कु.स्नेहल सुर्वे ,शासकीय कर्मचारी उपस्थित होते. 
          मासिक शिवमार्गचे हे दहावे वर्ष असून  अत्यंत आकर्षक स्वरूपात हे अंक प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंकामध्ये कथा विभागामध्ये "हृदयी वसंत फुलला या अरुणकुमार यादव लिखित कथेसह सुमारे सात काढा प्रसिद्ध केल्या आहेत. लेख विभागात जयश्री निंबाळकर यांच्या '' मी पाहिलेली सर्कस" बरोबरच सुमारे बावीस वाचनीय व विचारप्रवर्तक लेख आहेत. "गोष्ट एका सहलीची" या स्वतंत्र अनुभव विभागात अनेकांचे त्यांच्या प्रवासात आलेले विलक्षण व अंगावर शहारे आणणारे अनुभव शब्दबद्ध केले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने भिका जी मसवेकर,सुनंदा घोटीकर, पुष्प वारे, अनामिक बोरकर,इंद्रायणी आंबेकर ,माधव मेहेता, कांतीभाई राणीगा ,डॉ.सतीश पांडे, आशा काळे -वाकणकर, प्रकाश पित्तकर यांचा समावेश आहे. 
  सनातन संस्थेचे  परात्परगुरू डॉ. आठवले यांच्या "अमृतमहोत्सवी वर्ष '' निमित्त मासिक शिवमार्गने खास विभाग प्रसिद्ध केला असून अनेक साधकांचे त्यांच्यावरील अनुभव व मार्गदर्शक लेख प्रसिद्ध केले आहेत. त्या मध्ये नागेश गाडे,स्वाती खडे, योगेश जलतारे ,अंजली गाडगीळ ,मेघना वाघमारे, दादाजी वैंशपायण ,चंद्रशेखर तांदळे यांचा समावेश आहे. सुनील ओजाळे,संभू गवारे,सौ.गीता देशपांडे यांनी या स्वतंत्र विभागाचे संयोजन केले आहे. 
        शिवमार्ग दसरा-दिवाळी अंक-2016मध्ये "काव्यमार्ग' या कवितांच्या विभागात 27 कविता असून 'भविष्य मार्ग " या विभागात प्रा. पंडित हिंगे यांचे वर्ष भविष्य तर "हास्यामार्ग " या सदरात प्रा.बापूसाहेब घावरे, राजेन्द्र सरंग,घन्याश्याम देशमुख यांची हसरी व्यंगचित्रे आहेत.त्याशिवाय रमेश सहस्रबुद्धे,प्रभाकर शाळीग्राम ,प्रकाश पोळ, किशोर घोटगे, प्रमोद रोहणकार, धोंडीरामसिंग राजपूत यांचे विनोद व खमंग चारोळ्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 


  

Post a Comment

 
Top