Add

Add

0
प्रतिभा आरोग्य संपन्न योजनेच्या कासार आंबोली येथील कार्यशाळेत संपूर्ण जिल्हा रक्तक्षय मुक्त करण्याची जिल्हा आरोग्य विभागाने घेतली शपथ ...
पौड :- पुणे जिल्हा परिषद विविध विभाग विकास कामांच्या बाबतीत देशात आघाडीवरअसून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यातअग्रेसर असतो. या आरोग्य उपक्रमाचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्याआरोग्य विभागाने ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या
हेतूने ‘प्रतिभा आरोग्य संपन्न योजना’ सुरु केली आहे. अशी माहिती जिल्हाआरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. ते पुणे जिल्हा आरोग्य विभाग व मुळशीपंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त वतीने कासार आंबोली येथे घेण्यातआलेल्या एका कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या योजनेसंदर्भात
माहिती देताना पवार म्हणाले की, एका अभ्यासानुसार जिल्ह्यातील 48% महिलांनारक्तक्षय ( हिमोग्लोबिन कमी असणे) झालेला असून ही चिंतेची बाब आहे. हेच प्रमाणअन्य जिल्ह्यात व एकूणच देशात इतकेच किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकते. हीबाब लक्षात घेऊन पुणे जिल्हा परिषदेने एक रक्तक्षयमुक्त जिल्हा या स्वरूपाचे
मॉडेल अभियान राबविण्याचा संकल्प केलेला आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठीप्रत्येक तालुक्यातील आरोग्य सेवा कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक व आशा वर्करयांचा सहभाग महत्वाचा राहणार आहे. हे अभियान यशस्वी करून पुणे जिल्हा देशातीलपहिला या योजनेचे स्वरूप सर्वाना स्पष्ट व्हावे  त्याकरिता या कार्यशाळेचे
आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक मुळशी पंचायतसमितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाअधिकारी जठार, संवेदना संस्थेच्या प्रीती दामले यांनी मार्गदर्शन केले.तसेच रचना संस्थेच्या वतीने आरोग्यासाठी उपयुक्त अशा 80प्रकारच्या औषधी रानभाज्यां चे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाआरोग्य अधिकारी भगवान पवार व गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या हस्तेकरण्यात आले. यावेळी भाज्यांचे आरोग्यविषयक महत्व रचना संस्थेचे कार्यकर्तेश्रीपाद कोंडे यांनी सांगितले. डॉ.जठार यांनी प्रतिभा आरोग्य संपन्न अभियानाचे
स्वरूप स्पस्ट करून सांगितले. ते म्हणाले की, हे  अभियान पुणे जिल्ह्यातीलसर्व तालुक्यात 96 प्रा.आरोग्य केंद्र ,539 उपकेंद्र यांच्या माध्यमाने एकूण 19,,34969 पैकी 5,95325 लाभार्थी महिलांपर्यंत राबविले जात असून 1 नोवेंबर2016ते 31 जानेवारी 2017 पर्यंत जागृती, गरजूंना प्रत्यक्ष उपचार (100 दिवसलोहाच्या गोळ्यांचे सेवन सक्तीने करून घेणे) व अहवाल लेखन या तीन टप्प्यात हेपूर्ण होणार आहे. या वेळी आशा कार्यकर्त्यांना प्रसिद्धी साहित्य म्हणूनटोप्या व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारीखाडे, श्रद्धा हॉस्पीटलच्या डॉ.नगरकर, आरोग्य सेवा कर्मचारी, ग्रामसेवक,जी.प.शाळांचे केंद्रप्रमुख व आशा वर्कर उपस्थित होते. कार्यशाळेचे आभार मुळशीपंचायत समितीचे आरोग्य अधिकारी अजित कारंजकर यांनी मानले.

Post a Comment

 
Top