Add

Add

0

पुणे(विमाका): -जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जलसंधार णाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना शासनातर्फे राज्य, विभाग तसेच जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता इच्छुक पत्रकारांनी विभागीय पत्रकार पुरस्कारांसाठी २६ ऑक्टोबर पर्यंत तर राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी २ नोव्हेंबर २०१६ पर्यंत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे सादर करावी, असे आवाहन पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालकांनी केले आहे.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये भाग घेणाऱ्या मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील पत्रकारांनी ज्या जिल्ह्यांच्या कामांची, जलयुक्त शिवार अभियानाची प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती केली आहे अशा जिल्ह्यात पुरस्कार प्रस्ताव जिल्हास्तर समितीकडे २६ ऑक्टोबर २०१६ पर्यंत सादर करायचे आहेत. तसेच या दोन जिल्ह्यातील पत्रकारांनी ज्या महसूल विभागात जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती, पाणलोटाच्या यशोगाथा प्रकाशित केल्या असतील त्या पत्रकारांनी त्या विभाग स्तरावरील समितीकडे व राज्यस्तरावर प्रचार, प्रसिद्धी केली असल्यास राज्यस्तर समितीकडे प्रस्ताव दि. २ नोव्हेंबर २०१६ पर्यंत सादर करावेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी राज्यस्तर पुरस्कारांसाठी संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे यांच्याकडे २ नोव्हेंबर २०१६ पर्यंत आपले प्रस्ताव द्यावेत. जिल्ह्यातील पत्रकारांचे जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव स्वीकारण्याची तारीख २० ऑक्टोबर २०१६ होती. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

 अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय या लिंकमध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा दि. 28 सप्टेंबर 2016 रोजीचा शासन निर्णय,  दि. 10 ऑक्टोबर 2016 रोजीचे तसेच दि. २४ ऑक्टोबर २०१६ रोजीचे शासन  परिपत्रक पहावे, असेही कळविण्यात येत आहे.

Post a Comment

 
Top