Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):-“लाल सिग्नलला थांबा... हॉर्नचा वापर टाळा... हेल्मेट-सीट बेल्टचा वापर करा... अ‍ॅम्ब्युलन्स ला प्राधान्याने रस्ता द्या... पादचार्‍यांचा आदर करा... झेब्रा क्रॉसिंगच्या आधी थांबा...वाहतुकीची शिस्त पाळून पुण्याची सांस्कृतिक ओळख जपूया...” असा संदेश आणि प्रतिज्ञा पुणेकरांनी गुरुवारी उत्स्फूर्तपणे घेतली.
पुणे पोलिस आणि लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल यांच्या वतीने कर्वे रस्त्यावरील खंडुजी बाबा चौकात ‘6 ऑक्टोबर’ हा दिवस ‘वाहतूक जनजागृती दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी मानवी साखळी धरुन वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील 85, नगर व नाशिक येथील 40 लायन्स क्लब या जनजागृती अभियानात सहभागी झाले होते. विविध शाळांतील पाच हजाराहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ येथील अंध शाळांतील विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभागी होत त्यांच्या अडचणी  सांगतानाच वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन केले. सकाळी ठीक 11 वाजता सर्व चौकांत वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ देण्यात आली. 
पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचे जिल्हा प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, सर्व माजी जिल्हा प्रांतपाल, रिजन चेअरपर्सन, केबिनेट ऑफिसर, लायन्स मेम्बर, लिओझ, लायनेस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतुक जनजागृती करणारे एक लाखापेक्षा अधिक स्टीकर्स वाटण्यात आले. 100 फुटी बॅनर बनवून स्वाक्षरी करण्यात आला आहे. संयोजक आशा ओसवाल व सहसंयोजक नंदा पंडित यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. 

Post a Comment

 
Top