Add

Add

0
वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद; लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे आयोजन

पुणे (प्रातिनिधि):-  'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत', 'अहिंसाही जीवन का उद्देश हो', 'सार्वजनिक वाहतूक वापरा, प्रदूषण टाळा', 'महात्मा गांधी कि जय', 'लाल बहादूर शास्त्री की जय' अशा घोषणा देत जागतिक अहिंसादिनी (2 ऑक्टोबर) 5 ते 8 वयोगटातील 2500 मुलांनी महात्मा गांधी साकारले. निमित्त होते,लायन्स क्लब इंटर नॅशनल डिस्ट्रिक्ट 323 डी-2च्या वतीने लायन्स क्लबचे शताब्दी वर्ष आणि महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानासाठी आयोजित जनजागृती फेरीचे. 
रहाटणी येथील कापसे लॉन्स ते कोकणे चौक येथे परिसरातील 25 हून अधिक शाळांतील 5 ते 8 या वयोगातील 2500 मुलांनी महात्मा गांधींची वेशभूषा करून अहिंसा, स्वच्छता आदीचा संदेश दिला.या अनोख्या जागृती फेरीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली. वंडर बुकतर्फे डॉ.स्वर्णा श्री यांनी या फेरीत सहभागी झालेल्या गांधी वेशातील मुलांची मोजणी करून आतापर्यंत एकाचवेळी 2500 मुलांनी महापुरुषाच्या वेशात काढलेली ही पहिलीच फेरी असल्याचे सांगितले. या फेरीची दाखल घेण्यासाठी त्या खास हैद्राबादवरून आल्या होत्या. 
लायन्स क्लब्स इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे.जगभरातील 210 देशांत मानवतेच्या दृष्टिकोनातून गेली 100 वर्षे कार्य करीत आहे. यंदाचे वर्ष हे शताब्दी वर्ष असून, त्यानिमित्त अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता अभियान, स्मार्ट व्हिलेज, विविध प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, शौचालयांची बांधणी, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन अशा अनेक उपक्रमांत लायन्स निस्वार्थी भावाने सेवा करीत आहे. त्यातीलच हा एक उपक्रम असल्याचे जिल्हा प्रांतपाल लायन चंद्रहास शेट्टी यांनी सांगितले. 
लायन शाम खंडेलवाल, लायन नागेश चव्हाण,लायन हेमंत नाईक, लायन कोकणे, इनरव्हिलच्या शोभा श्रीकांत  यांच्यासह लायन्सचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, शाळेतील शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top