Add

Add

0

पुणे ( प्रतिनिधी):-आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना व त्यातील आरक्षण सोडती शुक्रवारी जाहीर झाल्या. या नव्या प्रभाग रचनेत विद्यमान प्रभागांची मोठी मोडतोड झाली आहे. तर, अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवक आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शहरात राजकीय उलथापालथ होणार आहे. राजकीयदृष्ट्या भाजपला ही प्रभाग रचना फायदेशीर होऊन, महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस बरोबरच मनसेला तिचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रभागांच्या रचना आणि त्यामधील आरक्षण यांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

 महापालिकेच्या 162 जागांसाठी 41 प्रभाग नव्याने तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 39 प्रभाग हे चार सदस्यीय असून, उर्वरित दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. या प्रभागांच्या सीमा व अंतर्गतहद्दी महापालिके कडून जाहीर करण्यात आल्या, या नव्या प्रभाग रचनेचा आणि त्यामध्ये पडलेली आरक्षणे, यामुळे राजकीय पक्षांच्या व्यूहरचनेवरही परिणाम होणार आहे. प्रभाग रचनेत अनेक ठिकाणी दोनपेक्षा अधिक प्रभाग एकत्रआले आहेत. त्यामुळे दोन प्रभागांमधील विद्यमान नगरसेवक एकत्र येऊन तेच आमने-सामने उभे ठाकणार आहे. तर, काही भागात विद्यमान प्रभागांचे तीनपेक्षा अधिक तुकडे झाल्याने विद्यमानांबरोबरच इच्छुकांचे मनसुबे उधळले जाणार आहेत. नव्याने पडलेल्या या आरक्षणांमुळे अनेक ठिकाणी उमेदवारीत बदल करावे लागणार आहेत. विद्यमान महापौर प्रशांत जगताप यांनाही प्रभाग रचनेची डोकेदुखी सहन करावी लागणार आहे. त्यांच्या
वानवडी प्रभागाची हद्द थेट बीटीकवडे रोडपर्यंत आली आहे.
 तर स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके आणि विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे यांचा प्रभाग एकत्र आला असून, त्यामध्ये एकच जागा खुली असल्याने ही दोघे आमने सामने उभी असणार आहेत. तर भाजपचे गटनेते गणेश बिडकर आणि मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र धंगेकर हेदेखील एकाच प्रभागात आल्याने त्यांना आमने सामने शड्डू ठोकावे लागणार आहेत. याशिवाय सभागृह नेते बंडू केमसे आणि मनसेचे गटनेते अ‍ॅड. किशोर शिंदे यांचा प्रभाग एकत्र आल्याने यांनाही एकमेकांविरोधात दंड थोपटावे लागणार आहेत. सेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांचा प्रभाग थेट नवीपेठपर्यंत जोडला गेला असल्याने त्यांच्याही अडचणीत भर पडली आहे. याव्यतिरिक्त नवीन प्रभागांमध्ये सतीश म्हस्के- अनिल टिंगरे- रेखा टिंगरे, सुनील गोगले- डॉ. सिद्धार्थ धेंडे, योगेश मुळीक - सचिन भगत, राजू पवार, दत्ता बहिरट- रेश्मा भोसले, सनी निम्हण- बाबूराव चांदेरे, गणेश बिडकर- रवींद्र धंगेकर- अजय तायडे, दिलीप काळोखे- हेमंत रासणे- अशोक येनपुरे, बापू कांबळे- अविनाश बागवे, चेतन तुपे- बंडू गायकवाड, मुरली मोहोळ - किशोर शिंदे असे विद्यमान समोरासमोर येणार असून, त्यांच्यातच लढत होण्याची शक्य
ता आहे.

Post a Comment

 
Top