Add

Add

0

पुणे (प्रतिनिधी):-  पंतप्रधान पीक विमा योजना रब्बी हंगाम 2016-17 साठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार असून या योजनेत सहभागी होण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2016 ही अंतिम मुदत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार असून कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. विमासंरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. या योजनेअंतर्गत 70 टक्के जोखिमस्तर देय राहील. विमा हप्ता-रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिका करीता फक्त 1.5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल तो विमा हप्ता भरावयाचा आहे. नगदी पिका करीता शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता दर फक्त 5 टक्के आहे.
 पुणे जिल्हृयाकरीता योजनेमध्ये समाविष्ट पिके,तालुके विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे- गहू बागायत समाविष्ट तालुके हवेली, मुळशी, भोर, जुन्नर, खेड, आंबेगांव, पुरंदर, शिरुर, इंदापूर, दौंड, बारामती विमासंरक्षित रक्कम 33 हजार रुपये, विमा हप्ता 217.80 रुपये. गहू जिरायत हवेली, मुळशी, भोर, जुन्नर, खेड, आंबेगांव, पुरंदर, वेल्हा, विमा संरक्षित रक्कम 30 हजार रुपये, विमा हप्ता 198 रुपये, ज्वारी बागायत हवेलीखेड, आंबेगांव, पुरंदर, शिरुर, इंदापुर, दौंड, बारामती, वेल्हा विमासंरक्षित रक्कम 26 हजार रुपये, विमा हप्ता 171.60 रुपये. ज्वारी जिरायत हवेली, मुळशी, भोर, जुन्नर, खेड, आंबेगांव, पुरंदर, शिरुर, इंदापुर, दौंड, बारामती, वेल्हा विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, विमा हप्ता 158.40 रुपये.हरभरा हवेली, मुळशी, भोर, मावळ,जुन्नर, खेड, आंबेगांव, पुरंदर, शिरुर, इंदापूर, दौंड, बारामती, विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, विमा हप्ता 158.40 रुपये. करडई शिरुर, इंदापुर, दौंड, बारामती, पुरंदर, विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये, विमा हप्ता 330 रुपये, .भुईमूग हवेली, भोर, खेड, आंबेगांव, पुरंदर, शिरुर, इंदापुर, दौंड, बारामती विमा संरक्षित रक्कम 36 हजार रुपये, विमा हप्ता 237.60 रुपये. कांदा हवेलीजुन्नर, खेड, आंबेगांव, पुरंदर, शिरुर, इंदापुर, दौंड, विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये विमा हप्ता 498 रुपये.
            रब्बी हंगामासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2016 असून पीक पेरणी पासून काढणी पर्यन्तच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट यासाठी योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळेल. तसेच नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट चक्रीवादळ, पूर, भूस्सखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदीसाठी विमा संरक्षण लागू राहील
हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी /लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी सदरची क्षेत्र हे सर्वसाधारणा क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहिल .
योजनेच्या अधिक माहितीसाठी नॅशनल इंशुरन्स कंपनी लि.मंडळ कार्यालय,3रा मजला स्टलिंग सिनेमा बिल्डिंग 65 मर्झबान रोड मुंबई -1 दुरध्वनी -०२२-२२०६७९१५ टोल फ्रि क्र१८००२००७७१० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शाखा, राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शाखा, नजिकचे विविध सोसायट्या, कृषि खात्याचे कृषी सहायक व कृषि पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभाबगीय कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.        

Post a Comment

 
Top