Add

Add

0

राळेगणसिद्धी (अहमदनगर) येथे पद्मावती मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात नुकत्याच संपन्न झालेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र” संस्थेच्या राज्यस्तरीय दोन दिवसीय पर्यावरण संमेलनात येथील पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर आणि राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विलास महाडिक यांना ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले  यावेळी व्यासपीठावर आबासाहेब मोरे आदि उपस्थित होते.   


चिपळूण(प्रतिनिधी):- ज्येष्ठ समाजसेवक,पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे यांच्या हस्ते, नुकत्याच राळेगण  सिद्धी (अहमदनगर) येथे पद्मावती मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात संपन्न झालेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्रया संस्थेच्या राज्यस्तरीय दोन दिवसीय पर्यावरण संमेलनात पर्यावरण संवर्धन विषयक सततचे जनजागृती कार्य आणि वनश्रीसंमेलन विशेषांकाची उत्कृष्ट निर्मिती-संपादन याकरिता येथील पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर आणि राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते विलास महाडिक यांना सन्मानित करण्यात आले.  

आपल्या संस्कृतीत प्राचीन भारतीय आणि महाराष्ट्रीयन समाज व्यवस्था खूपच जागतिक अनुकरणीय होती. यास्तव त्यावेळी आजच्या पर्यावरणाच्या भीषण समस्या नव्हत्या. अधिक बारकाईने अभ्यास करता, त्याकाळी समाजातील "शिक्षक" या समाज घटकाला खूप मानाचे स्थान होते. आणि त्या मानाप्रमाणे गावागावात शिक्षकही कार्यरत असत. अनेक गावात सकारात्मक बदल वा विकास होण्यात शिक्षकाची भूमिका  महत्वाची ठरत असे. आजच्या गंभीर "दुष्काळ-प्रदूषण" आदि समस्या पाहता पुन्हा एकदा समाजातील कृतीशील शिक्षकांना समाजाच्या केंद्रस्थानी आणण्याची निर्माण झालेली गरज ओळखून त्यांना वैचारिक पातळीवर आधिकाधिक सक्षम करण्याच्या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष पद्मभूषण अण्णा हजारे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंड़ळाचे सहसंचालक वाय. बी. सोनटक्के, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ प्रा. बी. एन. शिंदे, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विनोद मोहन, मंड़ळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने संमेलनाचा हा हेतू साध्य झाल्याचा आनंद राज्यभरातून उपस्थित सुमारे ५०० शिक्षक आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.    
शेतकर् यांना कार्बन क्रेडिट देणे, प्रत्येक शाळेत राष्ट्रीय हरित सेना स्थापन करून त्यांना किमान दहा हजार रुपयांचे अनुदान देणे, राज्यातील शाळांतील पर्यावरण तासिकांना स्वतंत्र वेळ देणे, वाहनांच्या पी.यु.सी. तपास णीचे अधिकार शाळांना द्यावेत,राज्यात प्रतिवर्षी पर्यावरण संमेलन होण्यासाठी प्रयत्न करावेत आदि ठराव कार्या ध्यक्ष आबासाहेब जगताप यांनी मांडले. संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. महाराष्ट्रात चंदनाचा सुगंध दरवळावा म्हणून गेली 15 वर्षे कार्यरत वनश्री महेन्द्र घागरे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेतील सहभागाबद्दल हरित सेना प्रमुख प्रमोद काकड़े, वनश्री बाळासाहेब जठार यांनाही अण्णांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संमेलनाला चिपळूणातून सह्यसागर संस्थेचे समीर कोवळे,आयुर्वेद अभ्यासक जगदीश थरवळ, प्राथमिक शिक्षक समितीचे मनोज मस्के,संतोष सुर्वे,संतोष कदम, विकास महाडिक,मिलिंद चव्हाण आदि सुमारे ४० शिक्षक सहभागी झाले होते.  

Post a Comment

 
Top