Add

Add

0
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उपक्रम उल्लेखनीय !
राळेगणसिद्धी (धीरज वाटेकर ):- आज या गावात शाळेतील मुलांनी लावून जगवलेली झाड़े आपल्याला सावली देत उभी आहेत. त्यामुळे सांगणार् याच्या  शब्दाला वजन असेल तर समाज आपले ऐकतो, हे नक्की आहे. या पार्श्वभूमीवर होणारे हे संमेलन पर्यावरण संवर्धनविषयक "लोकशिक्षण व लोकजागृती"साठी आवश्यक अस ल्याचे स्पष्ट प्रतिपादन,राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे अध्यक्ष पद्मभूषण ड़ाॅ.अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या “निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र” या संस्थेच्या वतीने आजपासून सुरू झालेल्या दोन दिवशीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी हजारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाजच्या सहसचिव दीपलक्ष्मी म्हसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंड़ळाचे सहसंचालक वाय. बी. सोनटक्के, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, हवामान तज्ज्ञ प्रा.
बी. एन. शिंदे, लार्सन आणि टुर्बोचे जनरल मॅनेजर वायकर, सीपीएफ इंड़िया प्रा. लि.चे मॅनेजर जावेद शेख, वनश्री महेन्द्र घागरे, रावसाहेब रोहोकले, मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, उपाध्यक्ष विलास महाडिक, बापूराव खामकर, कार्याध्यक्ष आबासाहेब जगताप, प्रियवंदा तांबोटकर, रामदास ठाकर,लालासाहेब गावड़े, मारूती कदम, सौ. कावेरी मोरे होते.
उद्घाटनानंतर विलास महाडिक आणि धीरज वाटेकर संपादित “वनश्री” या विशेषांकाचे अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. माधुरी काकड़े यांनी काव्यवाचन केले. सर्व मान्यवरांना मंडळ पदाधिकार् यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रात चंदनाचा सुगंध दरवळावा म्हणून गेली 15 वर्षे कार्यरत वनश्री महेन्द्र घागरे यांना त्यांच्या सहकारी श्रीमती चौधरी व सोनजे यांच्यासह, मंडळाच्या वतीने अण्णांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना अण्णांनी, धरणांची साठवण क्षमता कमी होत असल्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. आज सर्वत्र स्पर्धा आणि पळापळ सुरू आहे. आपण आपल्या वैयक्तिक प्रपंचासोबत आपला सामाजिक प्रपंच वाढविण्याचा सल्ला त्यांनी दिला. पर्यावरणाच्या प्रबोधनाचे विषय अधिकाधिक पुढे यायला हवेत,  असेही अण्णा अखेरीस म्हणाले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचलन वनश्री विशेषांकाचे अतिथी संपादक, मंड़ळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी केले. आभार कार्याध्यक्ष प्रमोद काकड़े यांनी मानले.

उद्घाटनानंतर वाय. बी. सोनटक्के यांचे “जलप्रदूषण व नियंत्रण”, पुंडलिक मिरासे यांचे “प्रदूषण नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी”, बी. एन. शिंदे यांचे “पर्जन्यमान वाढविता येईल” या विषयांवर व्याखान झाले. रात्री भोजन सत्रानंतर ह. भ. प. चाळक महाराज यांचे “अध्यात्म आणि पर्यावरण” या विषयावर हरिकीर्तन रंगले.           

Post a Comment

 
Top