Add

Add

0
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन

       

शनिवारी ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे विशेष व्याखान 

राळेगणसिद्धी :-महाराष्ट्रात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दिनांक 11व 12 नोव्हेंबर रोजी राळेगणसिद्धी (अहमदनगर) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण संमेलन २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे जैवविविधता दस्तावेjज या विषयावर विशेष व्याखान होणार आहे. संमेलनाला राज्यभरातून निमंत्रित 500शिक्षक आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, उपाध्यक्ष विलास महाडिक यांनी दिली.

संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 11.00वाजता पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे राज्य संचालक गोविंद नांदेडे, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाजच्या सहसचिव दीपलक्ष्मी म्हसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसचिव पुंडलिक मिरासे, संजय भुस्कुटे, देविदास कोपरकर, प्रमोद माने, ज्येष्ठ हवामान तज्ञ प्रा. बी. एन. शिंदे, राळेगणसिद्धीच्या सरपंच सौ. मंगल मापारी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभ प्रसंगी विलास महाडिक आणि धीरज वाटेकर संपादित वनश्रीया विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होईल.विशेषांकाचे अतिथी संपादक धीरज वाटेकर यांनी घेतलेली अण्णा हजारे यांची प्रदीर्घ मुलाखत, डॉ. माधव गाडगीळ, आबासाहेब मोरे, महेंद्र घागरे, संजय पठाडे, विनय मिरासे, प्रमोद काकडे यांचे लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. उद्घाटनानंतर वाय. बी. सोनटक्के यांचे जलप्रदूषण व नियंत्रण, पुंडलिक मिरासे यांचे प्रदूषण नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी”, बी.एन.शिंदे यांचेपर्जन्यमान वाढविता येईलया विषयांवर व्याखान होईल. रात्री भोजन सत्रानंतर ह. भ. प. चाळक महाराज यांचे अध्यात्म आणि पर्यावरणया विषयावर हरिकीर्तन होईल.         

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6.00वाजता योगशिक्षक कुमावत आणि चंद्रकांत तांबे यांचे योग व प्राणायाम”, सकाळी 9.00ते 11.30 वा.मा.अण्णा हजारे यांच्या सहवासात राळेगणसिद्धी परिसर भेट आणि विचारमंथन, दु. 12.00 ते 1.30 वा.पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे जैवविविधता दस्तावेजया विषयावर विशेष व्याखान होईल. दुपारच्या भोजन सत्रानंतर दुपारी 2.30 वाजता संमेलनाचा समारोप होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष अण्णा हजारे, प्रमुख पाहुणे म्हणून शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, डॉ. माधव गाडगीळ, प्रधान मुख्य वन संरक्षक ए.आर.चढ्ढा, अहमदनगर जिल्हाधिकारी अनिल कवडे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक चंद्रकांत तांबे, माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, श्रीसंत यादवबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव मापारी, राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी उपस्थित राहणार आहेत. 
संमेलनासाठी राज्यभरातील शिक्षक आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी मो.7588603861,9422376435,9422236710 येथे संपर्क साधावा.  

Post a Comment

 
Top