Add

Add

0
         उत्सव काळात मुळा-मुठा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी.. 
        पुण्यातील कमिन्स इंडिया कंपनीचा पर्यावरणपूरक उपक्रम 
पौड(प्रतिनिधी):-पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच घराघरातही गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. गौरी-गणपतीच्या या उत्सव काळात भाविक दररोजच्या पूजेसाठी हार,फुले,फळे,पाने,नारळ, दुर्वा व अक्षता याबरोबरच विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतात. या पाच ते दहा दिवसाच्या कालावधीत पूजेसाठी वापरलेल्या वस्तू साठवून गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी त्या मूर्तीबरोबर निर्माल्य पाण्यात सोडून देण्याची प्रथा आहे. या निर्माल्याबरोबरच पूजेत वाहिलेल्या  पैसे, कपडा तसेच निर्माल्य आदी वस्तू ज्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले असते त्या पिशव्या नदी व तलावात सोडून दिल्या जातात. यामुळे पुणे शहरातील मुळा- मुठा नद्यांची पात्रे, शहराभोवतालचे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात.ही बाब लक्षात घेऊन पुणे येथील कमिन्स इंडि या कंपनी दरवर्षी पुढाकर घेऊन उपक्रम राबविते आहे. 
पुणे शहरातील मुळा- मुठा नदीपात्रातील सुमारे 24 घाटांवर स्वच संस्था व पुणे महानगरपालिकाच्या मदतीने या कंपनीने  गणपती विसर्जनाच्या पाचव्या व दहाव्या दिवशी शेकडो स्वयंसेवक उभे करून निर्माल्य संकलित केले. या वर्षी हे निर्माल्य जवळपास 200टनाच्या आसपास जमा झाले होते. जमा झालेले निर्माल्य मुळशी तालुक्यातील अंबडवेट येथे एकत्रित करण्यात आले. त्यातील प्लास्टिक पिश व्या व अन्य विघटन न होणाऱ्या वस्तू गोविज्ञान संशोधन संस्थेकडून वेगळ्या करण्यात आल्या आणि या निर्माल्यावर देशी गायीच्या शेणानी  प्रक्रिया करून दीड महिन्यात कंपोस्ट खत निर्मिती तज्ञ मनोहर खके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यात आले आहे. तयार झालेले खत कमिन्स इंडिया लिमिटेड  व गोविज्ञान संशोधन संस्था,पुणे यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांना (ता.21नोव्हेबर) रोजी मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी कमिन्सचे सी.एस.आर.ग्लोबल हेडचे अधिकारी अमित लेले, सौजन्य वेगुरू, पी.एस.बी.यु.पुणे युनिटचे व्यवस्थापक संदीप क्षीरसागर, प्रशांत चितळे, निर्माल्य प्रोजेक्टचे समन्वयक अनिल कुलकर्णी, रुचिता शर्मा, गोविज्ञान संशोधन संस्थेचे डॉ.संतोष गटणे, अनिल व्यास, जी.प.चे माजी सदस्य सुभाष अमराळे, अंबडवेटचे उपसरपंच विलास अमराळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रमेश नागरे, हेमंत केसवड व गडदावणे परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित लेले म्हणाले की, गणपती उत्सवात निर्माल्यापासून होणाऱ्या प्रदूषणापेक्षाही प्लास्टर ऑफ प्यरीसच्या मूर्तीमुळे अधिक प्रदूषण होते त्यामुळे यामुर्ती शक्यतो शाडूच्या असाव्यात याबाबतीत जागृती करण्याची गरज आहे.
 या उपक्रमात कामगारांचा पगार ,वहातुक खर्च, तज्ञांचे मानधन याकरिता पुण्यातील कमिन्स इंडिया या कंपनीचे अर्थसहाय्य मिळाल्यामुळेच हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे शक्य झाल्याची माहिती गोविज्ञान संशोधन संस्थेचे संचालक अनिल व्यास यांनी दिली. उत्सव काळात पुण्यातील नदी पात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासंबंधी शहरी नागरीकांमध्ये जागृती निर्माण करणे  व अशाप्रकारच्या बायोमास पासून घराघरात उपलब्ध असलेले  भारतीय गायीचे शेण वापरून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत निर्माण होऊ शकते याचे प्रशिक्षण मुळशीतील शेतकऱ्यांना देऊन त्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त करणे हा कमिन्सचा प्रयत्न रहाणार असल्याची माहिती कमिन्सचे प्रशांत चितळे यांनी दिली. तसेच याबाबतीत अधिक माहिती देताना अधिक माहिती देताना अनिल व्यास म्हणाले की, या प्रकल्पामुळे दीड महिन्याच्या कालावधीत मुळशीतील अनेक आदिवासी व गरजू कामगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
फोटो – पुण्यातील गौरी-गणपती विसर्जनाच्या वेळी जमा केलेल्या निर्माल्यावर देशी गायीच्या शेणमि श्रणाची प्रक्रिया करून अंबडवेट ( ता.मुळशी ) येथे तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे गडदावणे येथील शेतकऱ्यांना वितरण करताना कमिन्स कंपनी व गोविज्ञान संस्थेचे अधिकारी       

-- 


Post a Comment

 
Top