Add

Add

0
पुणे :-महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयात ' स्वच्छ भारत 'अभियानातर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
पुणे पालिकेचे उपायुक्त संजय गावडे यांनी ' आरोग्यरक्षणासाठी स्वच्छतेचे महत्व  ' या विषयावर मार्गदर्शन केले. 'स्वच्छ भारत अभियान ' आणि ' स्मार्ट सिटी ' प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली.
विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी परिसर, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत राहण्याची शपथ घेतली. प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी स्वागत केले.

Post a Comment

 
Top