Add

Add

0
डॉ. आशीष लेले यांचे मत; 'मुक्तांगण'तर्फे  ‘मीट अ सायन्टिस्ट’ उपक्रमांतर्गत व्याख्यान
पुणे : ''पॅरिस करारानंतर देशाने अपारंपरिक ऊर्जेसंदर्भात मोठे काम केले असले, तरीही सध्या भारत 73 टक्के ऊर्जा पारंपरिक म्हणजे कोळसा, पेट्रोलियम पदार्थ यातून वापरत आहे.यातून होणाऱ्या वायुप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे.भारताची एकूण क्षमता बघता दैनंदिन जीवनात सौरऊर्जा, बायोमास या अपारंपरिक ऊर्जेचा वापर अधिक प्रमाणात होण्याची गरज आहे,'' असे मत राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळे तील  (एनसीएल) शास्त्रज्ञ डॉ. आशिष लेले यांनी व्यक्त केले. 
भारतीय विद्याभवन संस्थेच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त केंद्राच्या निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्याल याच्याच्या प्रांगणात ‘मीट अ सायन्टिस्ट’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय रासाय निक प्रयोगशाळा (एनसीएल) येथील डॉ. आशीष लेले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘पीईएम फ्युअल सेल : भारताची क्षमता आणि इंधननिर्मितीसाठी सीएसआयआरचे प्रयत्न’ या विषयावर डॉ. लेले यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी गप्पा गोष्टीतून समर्पक उत्तरे दिली. यावेळी केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, संमनवयक वेदवती काटकर, सुप्रिया इनामदार, निवेदिता गाडगीळ आदि उपथित होते. 
डॉ. आशिष लेले म्हणाले, ''संयुक्त राष्ट्र संघांच्या सहभागाने हवामान बदलावर गेल्या वर्षी सुमारे 200 देशांच्या सहभागाने पॅरिस येथे जागतिक परिषद झांली होती. यावेळी  भारताने अपारंपरिक ऊर्जा वापरासंदर्भात अनेक महत्वाच्या करारांवर सह्या केल्या. दैनंदिन जीवनात अपारंपरिक ऊर्जा अधिक प्रमाणात वापरण्याची गरज आहे. यात सौरऊर्जा, बायोमास, वारा ऊर्जेचा समावेश आहे. सध्या अपारंपरिक ऊर्जेसंदर्भात मोठे काम सुरु आहे, सध्या एकूण 20 गिगावॅट सौर ऊर्जा वापरात आहे. पुढील सहा वर्षात 100 गिगावॅट पर्यंत निर्मिती होईल. वायू उर्जेमध्ये हीच परिसथिती असून येत्या 8 वर्षात 50 गिगावॅट ऊर्जा निर्मित होईल. अणुउर्जेतही मोठी उत्पत्ती होण्याची गरज आहे. दूरसंचार क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठी क्रांती झाली आहे.''
''सध्याचे मोबाईल टॉवरच्या बॅकअप पॉवरसाठी सध्या वापरण्यात येणारे डिझेल जनरेटर मोठ्या प्रमाणात हवा आणि वायू प्रदूषण करत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने पुढाकार घेऊन फ्युएल सेल विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचे काम सुरु झाले असून पुढील वर्षी त्याचे प्रोटोकॉल युनिट बनवून प्रायोगिक तत्वावर राबविणार आहोत. ते यशस्वी झाल्यास त्याचे उत्पादन केले जाईल. यासाठी पुण्यातील  राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, चेन्नई येथील सेंट्रल इलेक्ट्रॉनिक केमिकल रिसर्च इन्स्टिटयूट आणि नवी दिल्ली येथील नॅशनल फिजिकल लॅबोरॅटरिने पुढाकार घेतला आहे,'' अशी माहितीही त्यांनी दिली. अनंत भिडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. 

Post a Comment

 
Top