Add

Add

0

                     परांजपे स्कीम्स उभारणार ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील पहिली टाऊनशिप...

  • प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर असणार ‘अथश्री’चे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर
  • 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पहिल्या सिनिअर लिव्हिंग एक्स्पोचे आयोजन

पुणे ( प्रतिनिधी):-ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेत पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव म्हणून सुपरिचित असलेल्या ‘परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेड’ यांच्या प्रयत्नांतून ‘अथश्री’ या खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या गृहसंकल्पनेला सुरुवात झाली. पुणे शहर आणि राज्यभरात अनेक ठिकाणी ‘अथश्री’चे प्रकल्प उभारल्यानंतर आता ‘परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेड एक पाउल पुढे टाकत फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली भारतातील पहिली परिपूर्ण टाऊनशिप उभारत आहेत. पुण्याजवळील भूगाव येथे ‘फॉरेस्ट ट्रेल्स’ प्रकल्पातील तब्बल 35 एकर जागेत ‘अथश्री व्हॅली’ ही सर्व सोयीसुविधांनी सुयोग्य अशी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. 
यासंबंधीची घोषणा ‘परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेडचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर, परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेड, अथश्री व्हर्टिकलचे  मुख्य कार्य कारी अधिकारी सुदेश खटावकर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते. सुनील गावस्कर हे ‘अथश्री’चे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर असणार असल्याची माहितीही शशांक परांजपे यांनी यावेळी दिली.

यावेळी बोलताना ‘अथश्री’चे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर सुनील गावस्कर म्हणाले, “माझी आई 91 वर्षांची आहे. सुदैवाने तिच्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची सोय मी करू शकतो. मात्र आज समाजात असे अनेक जण आहेत ज्यांना अशी काळजी घेणारे जवळ कोणीही नसते. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अथश्री’ गृहप्रकल्प हा आदर्श गृहप्रकल्प आहे. आज अनेक ठिकाणी आपण ‘वृद्धाश्रम’ पाहत असतो. मात्र वृद्धाश्रमापेक्षा ‘अथश्री’ सारख्या गृहप्रकल्पांची आपल्याला गरज आहे. कारण या गृहप्रकल्पात ज्येष्ठांना पल्या उतारवयात स्वाभिमानाने जगता येण्यासाठी सर्व सोयी पुरविण्यात आल्या आहेत.’’

‘अथश्री’ प्रकल्पाच्या भारतातील या पहिल्यावहिल्या टाऊनशिपबद्दल बोलताना परांजपे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा लक्षात घेत उतारवयात त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा टाऊनशिपची निर्मिती करण्याचा आमचा मानस होता. या आधी आम्ही ‘अथश्री’ गृहप्रकल्पाच्या माध्यमातून खास ज्येष्ठ नागरिकांसाठी सुयोग्य असे गृहप्रकल्प उभारले आहेत. याच उद्देशाने आम्ही एक दशकाहून अधिक काळ कार्यरत आहोत. आतापर्यंत सुमारे 1500 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य ‘अथश्री’मध्ये आहे. आता आणखी एक पाउल पुढे टाकत पुण्याजवळील भूगाव येथे असलेल्या ‘फॉरेस्ट ट्रेल्स’मध्ये ‘अथश्री व्हॅली’ ही भारतातील पहिलीच ज्येष्ठ नागरिकांसाठीची टाऊनशिप आम्ही उभारीत आहोत.’’
या 35 एकरच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या टाऊनशिपमध्ये 1आणि 2 बीएचकेच्या सदनिकांचा समावेश असून या अंतर्गत 358 सदनिका सादर करण्यात येणार आहेत. या टाऊनशिपमध्ये म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठीचे एक परिपूर्ण ठिकाण असणार असून यामध्ये खास ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी व अपेक्षा लक्षात घेत अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुख्यत: ज्येष्ठ नागरिकांसाठी एंटरटेंमेंट अरेना, क्रिएटिव्ह सेंटर, डब्लूआयआय गेमिंग झोन, ‘इसेंशिअल शॉपिंग फॉर कन्व्हीनिअन्स’, दोन क्लब हाउस, रोझ गार्डन, हर्बल गार्डन यांसारख्या सुविधांचा समावेश असणार आहे.
याशिवाय ‘अथश्री’च्या इतर प्रकल्पांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना राहण्याच्या,आरोग्याच्या अनेक सोईसुविधां बरोबरच आधुनिक सुरक्षा यंत्रणा, उपाहारगृह, बस शटल सेवा, लायब्ररी, पटपट गोल्फ (मिनी गोल्फ), आऊट डोअर टेनिस कोर्ट, कॅरम, चेस, कार्ड यांसारख्या इनडोअर गेम्स अशा अनेकविध सुविधा या टाऊनशिपमध्ये पुरविल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी साकारणा-या टाऊनशिपमध्ये मिनी हॉस्पिटल आणि मल्टी पर्पज ऑडीटोरिअम याबरोबरच आरोग्य व मनोरंजन यासाठी अतिशय महत्वाच्या अशा मेमरी केअर युनिट व असिस्टेड लिव्हिंग सेंटर यांसारख्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही परांजपे यांनी यावेळी दिली.
याबरोबर पुण्यातील बालेवाडी भागात ‘अथश्री – बालेवाडी’ हा गृहप्रकल्प सादर करण्यात येणार असून यामध्ये 1 व 2 बीएचकेच्या 95 सदनिकांचा समावेश असणार आहे. आतापर्यंत पुण्यात पाषाण, बाणेर, बावधन, हडपसर व भूगाव येथे ‘अथश्री’ची उभारणी करण्यात आली असून बेंगळूरू व वडोदरा या शहरांमध्ये ‘अथश्री’ गृहप्रकल्प साकारत आहेत. नजीकच्या भविष्यात नाशिक, गोवा, हैद्राबाद, अहमदाबाद, गुरगांव, चेन्नई, इंदौर व मुंबई जवळील काही ठिकाणी ‘अथश्री’ संकल्पनेचा विस्तार करण्याचा ‘परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेडचा मानस आहे. याशिवाय लवकरच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील हेवर्ड या शहरात ‘अथश्री’ हा गृहप्रकल्प साकारण्यात येणार आहे. तब्बल 5 एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यामध्ये1,2 आणि 3 बीएच केच्या 200 सदनिका उपलब्ध असणार आहेत. ज्यामध्ये अमेरिकेतील जीवनशैलीला पूरक अशा सर्व अत्या धुनिक सोयीसुविधा उपलब्ध असतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले
याबरोबरच येत्या 18ते 20 नोव्हेंबर दरम्यान ‘परांजपे स्कीम्स (कन्सट्रक्शन) लिमिटेडच्या वतीने म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन्स या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत होणा-या ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृहमहोत्सवाअंतर्गत शहरातील पहिल्या ‘सिनिअर लिव्हिंग एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे.
ज्यामध्ये एकाच छताखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अनेकविध सोयी- सुविधा, उपकरणे, स्मार्ट होम टेक्नॉलॉजी, हेल्थ केअर सर्व्हिस, फर्निचर, असिस्टेड लिव्हिंग, बँकिंग या व यांसारख्या इतर आवश्यक गोष्टींची माहिती ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी 40 हून अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. याबरोबरच त्यांच्यासाठी आरोग्य, आर्थिक व्यवहार व जीवनशैली यांसारख्या विषयांशी निगडीत चर्चात्मक कार्यक्रम व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानही या निमित्ताने करण्यात येईल.
या सिनिअर लिव्हिंग एक्स्पोच्या निमित्ताने शुक्रवार दि 18 नोव्हेंबर रोजी संगीतकार पं. ह्दयनाथ मंगेशकर तर रविवार दि.20 नोव्हेंबर रोजी ‘झी मराठी’ वाहिनीवरील पहिला हास्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे दीपक देशपांडे यांचा कॉमेडी शो पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. सिनिअर लिव्हिंग एक्स्पो’मध्ये आयोजित करण्यात येणा-या कार्यशाळा व कार्यक्रमाला कोणतेही प्रवेशशुल्क आकारण्यात येणार नाही.

Post a Comment

 
Top