Add

Add

0
 • पुणे :- विनोदी लेखक, व्याख्याते आणि आपल्या व्यंग्यचि त्रांच्या माध्यमातून कधी ओठावर हसू, तर कधी डोळ्यांत आसू आणणारे ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ प्रा. बापू लक्ष्मण घावरे यांचे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. राजस्थानमधील उदयपूर येथे ते सहलीसाठी गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तात डीने रुग्णालयात दाखल करण्यात आले,परंतु तेथे त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई,  नातवंडे असा परिवार आहे.
  ‘बहुरूपी’ हा त्यांचा कथासंग्रह साहित्य सांस्कृती मंडळाने1985
  साली प्रकाशित केला. ‘मोहिनीह्ण या दिवाळी अंकात त्यांचे 1989 मध्ये पहिले व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाले.
  त्यानंतर विविध दैनिकांत आणि दिवाळी अंकांसाठी त्यांनी तेरा हजारांहून अधिक व्यंगचित्रे काढली.त्याची 20प्रदर्शने पुणे शहरात आणि 5 ग्रामीण भागात झाली आहेत.यातील ठराविक व्यंग्यचित्रांची ‘लाफिंग क्लब’ आणि ‘हास्यवाटिका’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्यांचे ‘बहुरूपीह्ण आणि ‘शिमग्याची सोंगं’हे दोन विनोदी कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात त्यांनी शिक्षक ते उपप्राचार्य या पदांवर अनेक वर्षे सेवा केली.
 • Post a Comment

   
  Top