Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):- शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते श्री शरद  जोशी यांच्यावर वसुंधरा  काशीकर भागवत यांनी लिहीलेल्या ‘शरद जोशी–शोध अस्वस्थ काळोखाचा'या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रव्हिवा  दिनांक 6 नोव्हेंबर रोजी पुण्यात होत आहे. हे पुस्तक राज हंस  प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. 
शरद  जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विषयीच्या या पुस्तकाची पहिली आवृ त्ती प्रसिद्ध होताच संपली.या प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीश  बापट, तसंच प्रमुख वक्ते  म्हणून सुप्रसिद्ध लेखक  राजीव साने आणण राजहंसच्या  संपादिका विनया खडपेकर,तसेच अध्यक्ष म्हणून शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्ष सरोजताई काशीकर राहणार आहे
त. हा कार्यक्रम रविवारी  6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृटिक भवन,घोलरोड इथे संपन्न होतो आहे.याला शेतकरी संघटनेचे राज्यभरातील प्रमुख कार्यकर्ते  उपस्थित राहणार आहेत.
हे पुस्तक रूढ अर्थाने शरद जोशींचे चरित्र नाही. किंवा त्यांच्या नसत्या आठवणी नाहीत.तर शेतकरी नेता आणि  त्याच्या रूढ प्रतिमेपलीकडील व्यक्तिमत्वाचा  घेतलेला हा शोध आहे. 18 वर्षात शरद जोशीशी लेखिका अनेक विषयावर बोलत असत. त्यातून त्यांच्या रसिक,बुद्धिवान ,संवेदनशील ,तत्वचिंतक  व्यक्तिमत्तवाचे  मला घडलेले दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न आहे. गर्दीतल्या एकटेपणाचा आणि संघर्षही योध्याच्या मनाच्या हळव्या तळाचा घेतलेला हा शोध आहे असे पुस्तकाच्या लेखिका वसुंधरा काशीकर भागवत यांनी सांगितले. या प्रकाशन काययक्रमाला रसिकांनी उपस्थित  राहावे असे आवाहन लेखिका वसुंधरा  काशीकर भागवत यांनी  केले आहे.

Post a Comment

 
Top