Add

Add

0
पौड (प्रतिनिधी):-महाराष्ट्रातील भाजप सरकारने सत्तेची दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या दोन वर्षात महाराष्ट्रा च्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष झटला आहे.तसेच "सुराज्य" निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली आहे,या दोन वर्ष पूर्तीच्या निमित्ताने ''सुराज्यारंभ महा अभियान ''राज्यात राबविला जात आहे.या अभियानाद्वारे राज्य सरकारची महत्वपूर्ण कामगिरी व निर्णय हे स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुळशी तालुका भाजप च्या वतीने ''सुराज्यपर्व जनसंवाद यात्रा" चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाज पचे नेते ,माजी आमदार शरद ढमाले ,तालुका अध्यक्ष अशोक साठे,जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे,कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी दिली आहे. 
 ‘सुराज्यपर्व अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकारने दोन वर्षे सत्तेत राहून राज्यासाठी काय काय योजना राबविल्या,कोणते निर्णय घेतले,सर्वसामान्यांसाठी शासनाने कोण कोणती पाऊले उचलली आहेत,राज्याला प्रगतीकडे..सुशासनाकडे कसे नेले जात आहे? या व आदि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांची माहिती देण्यासाठी ‘‘भारतीय जनता पार्टी-मुळशी तालुका’च्या वतीने ही‘‘सुराज्यपर्व जनसंवाद यात्रा’’दि.26 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर -2016पर्यंत आयोजित केली आहे.या सुराज्यपर्वात (दि.31-10 -2016 ते 31 जानेवारी-2017 )महा राष्ट्राच्या ऐतिहासिक पुढार्‍यांना आदरांजली वाहणे आणि सुराज्य या योजनेविषयी राज्यात जास्तीत जास्त माहिती पुरवणे,तसेच लोकांमध्ये चर्चा घडवून,लोकांचीमते जाणून घेणे,सुराज्य स्नेह मेळावे आयोजित करणे ,‘व्हिजन महाराष्ट्र’या विषयावर निबंध लेखण व चित्रकला स्पर्धा आयोजन,दिग्ज नेते व पक्षाचे कार्यकर्ता यांच्यामध्ये ‘सुराज्य चर्चा’घडविणे,शौर्य सन्मान देऊन गौरव करणे,आम्ही महाराष्ट्रात सुराज्य स्थापित करत आहोत असा संकल्प करून त्यासाठी ‘सुराज्य संकल्प यात्रा काढणे,सुराज्य रथा द्वारे नागरिकांना सरकारच्या महत्वपूर्ण योजनांची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.आपल्या गावात येणार्‍या या यात्रेदरम्यान बहुसंख्येने उपस्थित राहून आपली शासनाविषयीची मते,मत्तांतरे आणि सूचना निर्भिड व मुक्तसंवादाने व्यक्त करा भाजपाचे कार्यकर्ते जो फॉर्म भरून घेत आहेत त्यामध्ये ती आवश्यक मांडा...आपल्या ग्राम विकासाच्या समस्या, अडचणी,योजना सूचीत करा..आम्ही त्या सोडविण्यासाठी आणि विकासासाठी झटण्यास कटीबध्द आहोत!!असे आव्हान मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. 
 ''सुराज्यपर्व जनसंवाद यात्रा"चा कार्यक्रम निश्चित करण्यात आले असून त्याचे नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अशोक साठे यांनी दिली आहे. 
शनिवार दि.26व रविवार दि.27 नोव्हेंबर-2016-कासारआंबोली पंचायत समिती गण-सकाळी9वा.प्रारंभ मारणे वाडी,भिलारेवाडी,आंबेगाव,कासारआंबोली,शिंदेवाडी,भरे,आंबडवेट,दारवली,करमोळी,सावरगाव,चाले,दखणे,नाणेगाव,होतले,डोंगरगाव,कोळवण,वाळेण,हाडशी,काशीग,भालगुडी,साठेसाई,नांदगाव,चिखलगाव,कुळे,मुगावडे 
सोमवार दि.28 व मंगळवार दि.29 नोव्हेंबर-2016-पौड पंचायत समिती गण-प्रारंभ-सकाळी 9 वा.विठ्ठलवाडी, पौड,कोंढावळे,चिंचवड,बेलावडे,खेचरे,मांदेडे,आंदेसे,कळमशेत,आकोले,शेरे,जामगाव,दिसली,माले,मुळशी खुर्द,
गोनवडी,पळसे,ढोकळवाडी,वारक,चाचिवली,ताम्हिणी,दावडी,सारोळे,निवे,डोंगरवाडी,आदरवाडी,परातेवस्ती,चोरघेवाडी,मोहोरी,शिरगाव,वडगाव,वाघवाडी,भादसखोंडा,वडुस्ते,भोरकस,वांद्रे,पिंपरी,आहेरवाडी,गोठा-सुसाळे,बार्पे, आडगाव,घुटके,भांबर्डे,एकोले,तैलबैला,बार्पे,तिस्करी,सालतर,माजगाव,आंबवणे,पेठशहापूर,घुसळखांब,नांदगाव,देवघर,विसाघर,कोळवली,कुंभेरी,मूळापूर,पोमगाव,शिरवली,चांदिवली,दत्तवाडी,शेडाणी,नांदिवली,वडवाथर,नानि वली ,वळणेवाडी,वळणे,संभवे,भादस,शिळेश्वर,आसदे,खुबवली,रावडे,हुलावळेवाडी . 
गुरूवार दि.1 व शुक्रवार दि.2 डिसेंबर-2016-बावधन पंचायत समिती गण-प्रारंभ-सकाळी 9 वा.बावधन,भुगाव, भुकून(सर्व वाड्या),लवळे,सुस 
शनिवार दि.3 व रविवार दि.4 डिसेंबर-2016-हिंजवडी पंचायत समिती गण-प्रारंभ-सकाळी 9 वा.म्हाळुंगे, हिंजवडी,नेरे,जांबे
सोमवार दि.5 डिसेंबर 2016-माण पंचायत समिती गण-प्रारंभ-सकाळी 9वा.कासारसाई,माण,नांदे,चांदे, मुलखेड,घोटावडे(सर्ववाड्या),आंधळे,कातरखडक,खांबोली,केमसेवाडी,जवळ,पडळघरेवाडी,रिहे(सर्ववाड्या), गोडांबेवाडी (समाप्त)
मंगळवार दि.6 व बुधवार 7 डिसेंबर 2016-पिरंगुट पंचायत समिती गण-प्रारंभ-सकाळी 9 वा.पिरंगुट,मुकाईवाडी, बोतरवाडी,चोरघेवाडी,काळभोरवाडी,उरावडे,मोरेवाडी,कातवडी,डावजे,कोंढूर,जातेडे,मुठा,आंदगाव,खारावडे,कोळावडे,लव्हार्डे,टेमघर,भोडे,सिध्देश्वर,वातुंडे,वांजळे,माळेगाव,कांगुरमाळ,दासवे,धामणओहोळ,भोयणी,पाथरशेत, पळसे,वडवली, घडवली,मोसे,साईव,तव,भोरदेव येथे "सुराज्य पर्व जनसंवाद यात्रेचा "समारोप होणार असून गुरुवार दि. 8 डिसेंबर रोजी -पौड-कासाराम्बोली जी.प/.गट,शुक्रवार दि.9 डिसेंबर ला माण-हिंजवडी जी.प.गट, शनिवार दि 10 डिसेंबर रोजी बावधन-पिरंगुट जी.प.गट मध्ये "सुराज्य पर्व स्नेह मेळाव्यांचे आयोजन अरण्यात आले आहे. या मेळाव्यास बहुसंख्येने कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

 
Top