Add

Add

0
                           माण गटात शिवसेना राष्ट्रवादीने केली चाचपणी सुरू ?
    पौड (प्रतिनिधी:-आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशींग बांधून निवडणुकांच्या आखाड्यात उतरणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती व घोगंडी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. बऱ्याच वर्षांनी हिंजवडी माण जिल्हा परिषद गट सर्वसाधासरण जागेसाठी खुला झाल्याने यावेळीची निवडणुक मोठी चुरसीची व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. 
     आगामी निवडणुकांची आरक्षण सोडत जाहिर शिवसेनेच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखतीं घोटावडे येथील राजयोग हाँटेलमध्ये घेण्यात आल्या. या बैठकीला पक्षाचे तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे, माऊली शेडगे, भानुदास पानसरे, नाना शिंदे, राम गायकवाड,युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र ओझरकर,हिंजवडीचे माजी सरपंच शामराव हुलावळे,तानाजी हुलावळे, कैलास मारणे, सुरेश मारणे, संतोष बुचडे, दिपक आबा करंजावणे, संदिप पारखी युवा सेनेचे तालुकाप्रमुख उमेश साखरे, महिला आघाडीच्या गिता गुजर यांच्यासह सर्व गण व गटातील व इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक व नातवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते 
हिंजवडी माण गटातील संभाव्य इच्छुकांची यादी पुढीलप्रमाणे कंसात इच्छुकांची गावे-... 
 बाळासाहेब चांदेरे,(सूस) मच्छिंद्र ओझरकर,(माण) माऊली केमसे,(कासरसाई) शामराव हुलावळे,(हिंजवडी) संतोषदादा मोहोळ,(म्हाळुंगे)प्रकाश भेगडे,(घोटावडे) संतोष बुचडे,(मारूंजी) सदिप पारखी,(माण) नामदेव भिलारे,(माण) तानाजी भोईणे,(रिहे) गणेश जाभूळकर(हिंजवडी)
 हिंजवडी पंचायत समिती गणातून शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांची यादी - अॅड प्राची चंद्रकांत बुचडे,(मारूंजी) सारिका उमेश साखरे,(हिंजवडी) सारीका सूर्यकांत साखरे, गिताताई गुजर (म्हाळुंगे) सारिका संतोष मोहोळ,पूजा रणभीर राजगुरू, (म्हाळुंगे)सुनीता तानाजी हुलावळे (हिंजवडी) विद्या राहूल जाधव (नेरे) शोभाताई बुचडे (मारूंजी) 
माण गणातून संभाव्य इच्छुकांची यादी  (गावे) - 
  प्रकाश भेगडे (घोटावडे)माऊली केमसे (कासरसाई) मचिंद्र ओझरकर (माण) रविकांत धुमाळ (घोटावडे) सुभाष रानवडे (नांदे) गणेश भोईणे (रिहे) रामचंद्र देवकर ,कुंडलीक मातेरे नवनाथ भेगडे,नितीन गोडांबे, राजाभाऊ शेळके (सर्वजण घोटावडे) 
 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. पक्षाच्या वतीनेही घोंगडी बैठकांची पहिली फेरी पूर्ण झाली असून पक्षश्रेष्ठीं ज्याला उमेदवारी देतील त्याचे काम करून मुळशीतील नऊच्या नऊ जागा जिकूंन मुळशी पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळविण्याचा मनोदय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 
 पक्ष कार्यकर्त्यांच्या हिंजवडी व माण गणात दोन ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. पक्षनिरीक्षक बबनराव भेगडे यांच्या उपस्थितीत हिंजवडीतील विठ्ठल लाँन्स मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीला पीडीसी बॅकेचे माजी अध्यक्ष संचालक आत्माराम कलाटे, सभापती महादेव कोंढरे, माजी सभापती रविंद्र बाबा कंधारे, पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, युवकचे तालुकाध्यक्ष पाडुरग ओझरकर, जिल्हा सरचिटणीस शंकर मांडेकर,युवा नेते सुरेश हुलावळे, सुहास दगडे, दिलीप हुलावळे,मगननाना जाधव,बबनराव साखरे,राजाभाऊ जाधव,विजय गायकवाड, नेऱ्याच्या सरपंच दिपाली जाधव,म्हाळुंग्याच्या सरपंच मालन पाडाळे, जांब्याच्या उपसरपंच रूपाली गायकवाड ऋषीकेश गायकवाड,संदीप साठे,यांच्यासह नेरे,जांबे,मारूंजी,म्हाळुंगे व हिंजवडीतील इच्छुक उमेदवार व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी उमेदवारी बाबत बोलताना मांडेकर म्हणाले, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन उमेदवारी दिली पाहीजे. उमेदवारी देताना प्रत्येक गावातील सरपंच,सदस्यांची मते विचारात घेतली पाहिजेत. गाव छोटे की मोठे याचा विचार न करता निवडून येण्याची पात्रता असलेल्या उमेदवारांची निवड केली पाहिजे. 
   बाबा कंधारे म्हणाले,पक्षाच्या माध्यमातून केलेली विकासकामे कार्यकत्यांनी जनतेपर्यंत पोचविली पाहि जेत.हिंजवडी माण गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत झाल्याने तालुक्याचे लक्ष या गटाकडेच लागले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा आपले विरोधकच हिंजवडी गटात राष्ट्रवादीत काय होणार याची चर्चा करतात. त्यामुळे पक्षनिरीक्षकांनी या गटात अधिकचे लक्ष घातले पाहिजे. राज्यात आपलं सरकार नसतानाही मुळशीला दोनदा निर्मलग्रामच्या पुरस्काराने गौरविले गेले.
तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले,सर्व कार्यकर्त्यांनी ग्रासरूटला येऊन काम केले तर विजय निश्चीत आहे. पूर्वीच्या काळी राजकीय मंडळींनी राजकारणाचा वारसा दुसरीकडे सोपविण्यासाठी त्याग केल्याची उदाहरणे त्यांनी दिली. तर या गटातून विजयी होणारा उमेदवार हा उच्चपदांवर गेल्याचा इतिहासही त्यांनी मार्मीक दाखले देत त्यांच्या शैलीत मांडला. यावेळी जांबे, नेरे,म्हाळुंगे हिंजवडीतील इच्छुक उमेदवारांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी आपापली भूमीका मांडली.  
सूत्रसंचालन रामदास पायगुडे यांनी तर आभार पोलिस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप जाधव यांनी मानले. 
हिंजवडी माण जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेले संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे असल्याची माहीती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी दिली.
  सुरेश हुलावळे (हिंजवडी) शंकर मांडेकर (चांदे) बाळासाहेब तापकीर (मुलखेड) राजाभाऊ जाधव,(नेरे) विठ्ठल गोडांबे (घोटावडे)   
हिंजवडी गण इच्छुकांची यादी -दिपाली संदिप जाधव (नेरे) मालन अर्जुन पाडाळे (म्हाळुंगे) सविता विजय गायकवाड (जांबे) जान्हवी शिवनाथ जांभूळकर (हिंजवडी) कोमल रामदास बुचडे (मारूंजी) बेबीताई दिलीप हुलावळे (हिंजवडी) स्मिता जांभूळकर (हिंजवडी) 
 माण गणातील संभाव्य इच्छुकांची यादी - पांडुरंग ओझरकर (माण) नंदकुमार भोईर (माण) आनंदा घोगरे ( घोटावडे) संतोष मोहिते (माण) सुनील भरणे (माण) अनिल मोरे (रिहे) तात्या देवकर (घोटावडे)    

Post a Comment

 
Top