Add

Add

0
   पुण्याच्या  खासदार  ऍंड .वंदना चव्हाण  यांच्याकडून  पूज्य साने गुरुजी विद्यामंदिरला
                                             संगणकी करणासाठी ४ लाख रुपये 

पालगड :-मातृप्रेमाचे महान स्तोत्र म्हणून ज्या आईच्या अनुभवांमुळे  आणि शिकवणुकीमुळे ओळखले जाते त्या 'श्याम च्या आई ' यशोदा यांच्या स्मृती शताब्दी वर्षास पालगड येथील साने गुरुजी यांच्या स्मारक असलेल्या निवास स्थानी २ नोव्हेंबर रोजी दीपोत्सवाने प्रारंभ झाला . 
साने गुरुजींचे जन्मस्थान असलेल्या पालगड मध्ये साने गुरुजींचे राहते घर स्मारक करण्यात आले आहे . बुधवारी सायंकाळी गावातील तरुण ,विद्यार्थी आणि गावकरी एकत्र जमले आणि त्यांनी या स्मारकावर पणत्या लावल्या ,झेंडूच्या फुलांची सजावट केली . 
'साने गुरुजी स्मृती समिती -पालगड ' चे अध्यक्ष दीपक बीडकर  तसेच गौरी बीडकर ,उद्धव सुपेकर यांच्या समवेत ग्रामस्थ ,विद्यार्थी आणि युवकांनी साने गुरुजी स्मारकावर पणत्या लावून परिसर उजळून टाकला . पुण्याच्या राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांनी 'श्यामची आई  स्मृती शताब्दी ' वर्षानिमित्त पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर ला संगणकीकरणासाठी ४ लाख रुपये रक्कम मंजूर केली आहे . 
मंजुरीचे पत्र शाळेचे मुख्याध्यापक   बी डी पाटील ,प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक बी बी पाटील ,विकास वाचनालयाच्या ग्रंथपाल सुलभा कदम यांना देण्यात आले .या निधीतून पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर ,जीवन शिक्षण विद्या मंदिर ,विकास वाचनालय यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे ,अशी माहिती समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी दिली 
'साने गुरुजी स्मृती समिती -पालगड तर्फे 'श्यामची आई ' स्मृती शताब्दी निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे . अनेक संस्थाही राज्यभर  कार्यक्रम ,उपक्रम आयोजित करणार असून शैक्षणिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी ८ नोव्हेंबर  रोजी पालगडला भेट देणार आहेत 

Post a Comment

 
Top