Add

Add

0
पुणे(वि.मा.का.)  : जागतिक मत्स्यव्यवसाय दिना निमित्त येत्या रविवार दि. 20 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत निरा (ता.पुरंदर) येथे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे  सहायक आयुक्त विजय शिखरे यांनी दिली आहे.

     दरवर्षी 21 नोव्हेंबर हा जागतिक मत्स्यव्यवसाय दिवस म्हणून साजरा केला जातो.  त्यानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये मत्स्यशेतीसाठी आवश्यक पूर्व तयारी व्यवस्थापन ते विक्री व्यवस्थापन, पाणी चाचणी स्वतः कशी करावी; तसेच गिफ्ट तिलापिया माशाच्या उत्पादनाबाबत प्रगतशील शेतकऱ्यांमार्फत मत्स्यतळ्यावर मार्गदर्शन करण्यात येईल.मत्स्यशेतीसाठी शेततळे किंवा जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या व मत्स्यशेती करण्यास उत्सुक व्यक्तींनी कार्यशाळेमध्ये भाग घेण्यासाठी  विजय शिखरे (मो. क्र. 8828385018) व जनक भोसले (9422314818)  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. शिखरे यांनी केले आहे. 

Post a Comment

 
Top