Add

Add

0
उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

पुणे (विमाका):- वनरक्षक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेली भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शकपणे राबविण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी केले आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक क्षमता चाचणीत प्रथम येणारे पद संख्येच्या तीन पट उमेदवार पुढील फेरीसाठी पात्र होतील. त्यांनतर त्यांची शारीरिक पात्रता तपासून पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादी प्रवर्गनिहाय इयत्ता दहावी / बारावी उत्तीर्ण मधील गुणांना ८७.५ टक्के इतके भारांकन व धावण्याची चाळणी चाचणी परीक्षेमधील १२.५ टक्के पैकी गुण लक्षात घेऊन तयार करण्यात येईल. ही सर्व भरती प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित राहील. भरती प्रक्रियेवर अवैध माध्यमातून प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्यासह त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

उमेदवाराने कोणत्याही दबावास बळी पडू नये व भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. उमेदवारांचे काही प्रश्न, तक्रार असल्यास उपवनसंरक्षक, सत्यजित गुजर, दूरध्वनी क्र. ०२०/२५६६०५९३, ईमेल-dycfpune@gmail.com आणि मुख्य वनसंरक्षक जीतसिंग, दूरध्वनी क्र. ०२०/२५६६४१८२, २५६६४१८३, ईमेल- ccftpune@gmail.com येथे संपर्क साधावा, असेही  श्री. गुजर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

 
Top