Add

Add

0
धायरी (प्रतिनिधी):- समाजसहाय्य आणि अध्यात्मप्रसार या उद्देशाने 'धर्मसभा'न्यासाच्या अंतर्गत विविध उपक्रम नियमितपणे राबवण्यात येतात. व्यक्तीच्या पारमार्थिक उन्नतीसह समाजराष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षालादेखील प्राधान्य दिले जाते. योग शिबिरेजनजागृतीपर व्याख्यानेफळे वाटप,वह्या वाटपविनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप शिबिरे,मंदिर स्वच्छतातणावमुक्ती व व्यसनमुक्ती यांसाठी प्रबोधन करणे,विविध ठिकाणी गरजूंना अन्नदानकपडे वाटप असे कार्यक्रम आयोजित केले जातात.
समाजाचा मुख्य घटक असलेल्या महिलांच्या आरोग्याविषयी जागरूक असणे आवश्यक असते. कारण महिलांचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंबाचे आरोग्य चांगले आहे, असे आपण म्हणू शकतो. घरातील एक महिला शिक्षित असेल तर ती संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते त्याचप्रमाणे घरातील महिलेचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंबांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगले असते. अशा कुटुंबातूनच देशाचे हित साधणारी आदर्श पिढी घडत असते. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवन पद्धतीमध्ये मुले आणि कुटुंबाचे पालन करताना महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.

शक्ती स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांची 16 ऑक्टोबर या दिवशी धर्मसभा न्यासाच्या अंतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. (सौ.) आशा खोत यांनी महिलांची सर्वसाधारण तपासणी करून त्यांना औषधे दिली. तसेच ‘हिवाळ्यात आरोग्याची घ्यावयाची काळजी आणि डेंग्यूचा प्रतिबंध व उपाय !’ या विषयावर मार्गदर्शन केले. सौ. सुनिता कोपनर, सौ. सुषमा साबळे, सौ. सारिका रायकर, सौ. स्वाती आतकरे यांच्यासह बचत गटातील आणि परिसरातील 40 महिलांनी उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रंजना आखाडे उपस्थित होत्या व त्यांचे उपक्रमास सक्रीय सहकार्य लाभले. या उपक्रमाचे आयोजन सौ. मिना गोले यांनी केले. हा उपक्रम सामाजिक जाणिवेच्या अनुषंगाने घेण्यात आला व त्याला चांगला प्रतिसाद देखील लाभला.

Post a Comment

 
Top