Add

Add

0
पिंपरी/पुणे :- भारतीय विद्याभवन संस्थेच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘मीट अ सायन्टिस्ट’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) येथील डॉ. आशीष लेले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पीईएम फ्युअल सेल : भारताची क्षमता आणि इंधननिर्मितीसाठी सीएसआयआरचे प्रयत्न’ या विषयावर डॉ. लेले बोलणार आहेत.
शनिवार, दि. 26 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्याच्या प्रांगणातील मनोहर सभागृहात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, त्याचा विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी 7038128207 किंवा 7218778851 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे यांनी केले आहे.

Post a Comment

 
Top