Add

Add

0
             देशातील पहिला यशस्वी प्रयोग भूकुमच्या वृंदावन गोशाळेत 
आयव्हीएफ तंत्राच्या प्रयोगाप्रसंगी खाटपेवाडी-भूकुम (ता. मुळशी) येथील लेले वृंदावन गोशाळेत उपस्थित जे. के. ट्रस्टचे अध्यक्ष व रेमंड उद्योगसमूहाचे प्रमुख विजयपत सिंघानिया, वृंदावन काऊ क्लबचे प्रमुख चंद्रकांत भरेकर, डॉ. श्याम झंवर, डॉ. धनंजय परकाळे व अन्य पदाधिकारी
. पौड(प्रतिनिधी):-'' देशातील देशी गोवंशाची वरचेवर विविध कारणांनी संख्या कमी होत असून याकरिता सर्वच स्तरातून प्रयत्न होत असून त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील जे.के.बोव्हा जेनिक्स व वृंदावन गोशाला भूकुम यांच्या संयुक्त विद्यमाने वृंदावन गोशाला खाटपेवाडी भूकुम येथे आय. व्ही. एफ. या तंत्राच्या साह्याने एक क्रांती घडून येणार असल्याची माहिती जे. के. बोव्हा जेनिक्स संशोधन संस्थेचे डॉ. श्याम झंवर यांनी दिली. 
भूकुम येथील गोशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने 3 थारपारकर गायीची गुण (बीजे) एकत्र करून ती संग्रहित करण्याचे देशातील पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जे. के. बोव्हा जेनिक्स संशोधन संस्थेचे प्रमुख, वृदावन काऊ क्लबचे डायरेक्टर चंद्रकांत भरेकर उपस्थित होते. या प्रकल्पाबद्दल या वेळी माहिती देताना भरेकर म्हणाले, की जगात गायींच्या 300 प्रजाती होत्या त्यापैकी केवळ 72 प्रजाती शिल्लक केलेली आहेत. यापैकी दुर्मिळ असलेली थारपारकर ही जात राजस्थान व महाराष्ट्रात जतन केली जात आहे. वृंदावन गोशालेने 120 गायींचे संगोपन व संवर्धन केले आहे. बहुतांशी गोशाळेत गायीच्या दुध, शेण व गोमुत्राचा वापर करून विविध पदार्थ बनविले जातात. वृंदावन गोशाला या उत्पादनाबरोबरच गायींच्या संख्येत वाढ करण्याच्या हेतूने जे. के. बोव्हा जेनिक्स संशोधन संस्थेच्या सहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोग करीत आहे. या प्रयोगात निश्‍चित यश येऊन मोठी क्रांती घडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, की एक गाय एका वर्षाला एक वासरू देते, या तंत्राने एका वर्षात किमान दहा ते बारा वंश जन्माला घालून देशभरात या प्रजातीचा वेगाने संख्या वाढविण्यास मदत होणार आहे. जे. के ट्रस्टच्या माध्यमाने आय. व्ही. एफ. या तंत्रज्ञानावर सखोल संशोधन करण्यात आले असल्याची माहिती जे. के. ट्रस्टचे अध्यक्ष व रेमंड उद्योगसमूहाचे प्रमुख विजयपत सिंघानिया यांनी सांगितले. या वेळी ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी डॉ. श्याम झंवर, केदार तीर्थ डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते. 

या वेळी संशोधनासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. झंवर म्हणाले, की गायीमधील योग्य बीजे काढून ती आवश्यक त्या तापमानात संग्रहित करून पुढे उत्तम वळूच्या शुक्रजंतू वापरून अन्य गायीच्या गर्भात त्याचे रोपण करून चांगल्या दजार्ची वासरे जन्माला घातली जातील हे तंत्र टेस्टट्यूब बेबीसारख्या तंत्राप्रमाणेच आहे. या तंत्राने ज्या गायी व बैलाच्या शुक्रजंतूचा वापर केला आहे त्याप्रमाणेच वंश जन्माला येईल त्यात कोणताही बदल होणार नाही.

Post a Comment

 
Top