Add

Add

0
उपसंचालक भुमी अभिलेख पुणे श्री. गिरीश राव यांनी दिले चौकशीचे आदेश 

पुणेः- पुणे जिल्हयातील धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवलेल्या दौंड तालुक्यातील भुखंड व जमीनींची महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी बनावट कागदपत्र व नकाषे तयार करून लॅन्ड माफीया यांना हाताशी धरून विक्री केली आहे.
        या बाबत वीर बाजी पासलकर ग्रामीण विकास केंद्राचे  अध्यक्ष श्री. महेंद्र प्रभाकर पासलकर यांनी महाराष्ट्र राज्याचे जमाबंदी आयुक्त श्री. संभाजी कडु पाटील यांना दि. 17/2/2016 रोजी पत्रव्यवहार करून या घोटाळयाची चौकशी करणेकामी निवेदन दिले होते, त्याअनुषंगाने श्री.कडु यांनी उपसंचालक भुमी अभिलेख, पुणे प्रदेश पुणे श्री.गिरीश राव यांना सदर प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.सदर चौकशीअंती श्री. राव  यांनी या बाबत चौकशी करून दि. 31/08/2016 रोजी चौकशी अहवाल मा. जमाबंदी आयुक्त महाराश्ट्र राज्य यांना सादर केला.
   सदर अहवालात नमुद केल्याप्रमाणे पुढीलप्रमाणे अनियमितता केल्याने संबंधितांवर कार्यवाही करणे बाबत मा. जिल्हा भुमी अधिक्षक, पुणे यांना कळविण्यात आले ते पुढील प्रमाणे.
1) मिळकत पत्रिका उघडतांना, धारकांच्या नोंदी घेताना आवष्यक ती कागदपत्र, आदेश यांची पडताळणी केलेली दिसुन येत नाही
2) बोगस वारस नोंदी केलेल्या आहेत.
3) मिळकत पत्रिकेवर नवीन शर्त प्रकारची नोंद घेतलेली नाही.
4) 7/12 वर नाव नसताना सुध्दा त्रयस्त लोकांची नावे टाकुन बोगस मिळकत पत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत.
5) बेकायदेशीररीत्या विक्री  केलीे आहे. 
    इत्यादी बनावट कारभाराबाबत संबंधितांविरूध्द कारवाई करणेबाबत कळविण्यात आले आहे अशी माहिती वीर बाजी पासलकर ग्रामीण विकास केंद्राचे अध्यक्ष श्री. महेंद्र प्रभाकर पासलकर यांनी दिली. यावेळी संदीप कडु, महेश पायगुडे, काषिनाथ कडु,गणपत कडु, बाळासाहेब पायगुडे, दामोदर देशमुख, भरत कडु, नाना मोेरे, सखाराम गोडावळे, माउली निढाळकर, सोपान कडु, प्रताप कडु, सुभाष काकडे, अनंता निवंगुणे, संतोष बबनराव कडु, इ. लोक पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

Post a Comment

 
Top