Add

Add

0
पुणे : - दिवाळी निमित्त "पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया' आणि "यंग कम्युनिकेटर्स क्लब' च्या वतीने  पं.हरिप्रसाद चौरसिया आणि पं.भवानीशंकर यांचा सन्मान "पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया ' चे राष्ट्रीय सचिव अविनाश गवई आणि  "यंग कम्युनिकेटर्स क्लब' चे अध्यश रिदम सुधीर वाघोलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.दिवाळी पाडव्याच्या सायंकाळी हॉटेल प्राईड येथे हा कार्यक्रम झाला.
 " संगीताच्या माध्यमातून अनेक दशके आपण उच्च भारतीय परंपरा आणि एकात्मतेचा संदेश दिला.नव्या पिढीन नवी माध्यमे वापरताना संदेशाचे गांभीर्य कमी होऊ देऊ नये  ' असे प्रतिपादन पं.हरिप्रसाद चौरसिया यांनी यावेळी केले."ेसंगीत हा सर्वोच्च मानवी आविष्‌‌कार असून या सर्वव्यापी संदेशवहनातून मानवी जीवनातील दरी कमी करता येते ' असे यावेळी पं.भवानीशंकर  म्हणाले.
 "पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया' च्या कामाची माहिती अविनाश गवई यांनी दिली.तरुणांमधील संवादकौशल्यवृध्दीबाबत पुण्यात सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल रिदम सुधीर वाघोलीकर यांनी माहिती दिली.

Post a Comment

 
Top