Add

Add

0

पौड (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 तालुका शाखा मुळशी जिल्हा पुणे यांच्या वतीने पंचायत समिती मुळशी येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी असहकार व काम बंद आंदोलन दि. 7 रोजी करण्यात आले.
कंत्राटी ग्रामसेवक तीन वर्षे सेवाकालावधी नियमित करणे, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर झालेली चुकीची कारवाई रद्द करणे, ग्रामसेवकांना पगाराबरोबर दरमहा तीन हजार रुपये प्रवासभत्ता मंजूर करणे, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्मिती करणे, २0११च्या लोकसंख्येवर आधारित ग्रामविकास अधिकारी पदे व सजे निर्मिती होणे, ग्रामसेवक संवर्ग शैक्षणिक अर्हता पदवीधर होणे, ग्रामसभेची संख्या निश्‍चिती व इतर यंत्रणा सभा सचिव बदल करणे, ग्रामसेवक संवर्ग वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळणे, राज्यस्तरावर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आयोजन करणे, 12जून 2013चे विनाचौकशी फौजदारी परिपत्रक मागे घेणे, विस्तार अधिकारी पदे वाढविणे व समाजकल्याण विस्तार अधिकारी पदे भरणे,2005नंतर सेवेत रुजू झालेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, ग्रामसेवक संवर्गासाठी सुधारित जॉब चार्ट लागू करणे, निलंबित ग्रामसेवकांना सेवेत कायम करण्यासाठी कालावधी ठरवून देणे, ग्रामसेवकांवर होणारे हल्ले मारहाण व खोट्या केसेस याबाबत सेवा संरक्षण व सरकारी कर्मचारी मारहाण गुन्हा अजामीनपात्र करणे. 
या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी आंबेगाव तालुक्यातील 62 ग्रामसेवकांनी पंचायत समितीसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी राज्यव्यापी आंदोलनाची माहिती व रूपरेषा सांगितली. 
दि. 7 नोव्हेंबर रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन व असहकार दि.11नोव्हेंबर रोजी जि.प. पुणे येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. दि.15नोव्हेंबर रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन, दि. 17नोव्हेंबरपासून सर्व ग्रामसेवक काम बंद आंदोलन सुरू करून पंचायत चाव्या व शिक्के गटविकास अधिकारी यांच्याकडे देतील. 
तालुकाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी जुने अनुभव सांगितले व मार्गदर्शन केले. आंदोलन सहभागाविषयी गटविकास अधिकारी डॉ.स्मिता पाटील यांना संघटनेच्या सर्व संचालक व सदस्य यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.     

Post a Comment

 
Top