Add

Add

0
(सोमवार, दि. 21 नोव्हेंबर ते रविवार, दि.27 नोव्हेंबर 2016)
पुणे(प्रतिनिधी):- विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 21 नोव्हेंबर ते रविवार, दि.27 नोव्हेंबर 2016 रा दरम्यान संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 720 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले आहे.कार्तिकी एकादशी रात्रेनिमित्त होत असले ल्या या सप्ताहात ‘श्रीसंत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे लोकप्रबोधनपर विशेष कार्रक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहाचे उद्घाटन सोमवार, दि. 21 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.00 वाजता होणार आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध संगणकतज्ञ व सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक पद्मश्री डॉ. विजय भटकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित महादेव कुलकर्णी, देहू येथील श्रीतुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.शांताराम एकनाथ मोरे, आळंदी नगर पालिकेचे नगराध्यक्ष श्री. रोहिदास तापकीर, उपनगराध्यक्षा सौ. अंजनाताई वसंत कुर्‍हाडे, इंद्रायणी मातेच्या आरतीचे मानकरी ह.भ.प.श्री.गणपतराव कुर्‍हाडे पाटील व देहू गावच्या सरपंच सौ. सुनिता चंद्रकांत टिळेकर हे उपस्थित राहाणार आहेत.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आरोजन केले जाते.बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयावरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे
या सोहळ्यात आळंदी येथील ह.भ.प.श्री. आसाराम महाराज बडे, हडपसर, पुणे येथील ह.भ.प. श्री. भानुदास महाराज तुपे, आयोध्या येथील रामजन्मभूमी शिलान्यासाचे माजी कार्यकारी अध्यक्ष व माजी खासदार डॉ. रामविलास वेदान्ती, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प.श्री. बबनरावजी पाचपुते, जगद्गुरु संत तुकाराम महाराज रांचे वंशज ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे-देहूकर इत्यादी मान्यवरांच्या प्रवचनातून विज्ञान, अध्यात्म व विविध धर्मांचा शांती संदेश यावरील विचार भाविकांना ऐकायला मिळणार आहेत.
संध्याकाळच्या सत्रात मुंबई येथील वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्री. रामेश्‍वर महाराज शास्त्री, ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर, बीड, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व रामायणाचार्य ह.भ.प.श्री. रामराव महाराज ढोक,  ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. बाबामहाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने होतील. 
रात्रीच्या सत्रात स्व. पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित उपेंद्रजी भट यांचे अभंगवाणी गायन, विश्‍वशांती संगीत कला अकादमी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा अभंगवाणी व भक्तीगायनाचा कार्यक्रम, 63वे राष्ट्रपती चित्रपट पुरस्कार विजेते पार्श्‍वगायक मा. श्री. महेश काळे यांच्या अभंगवाणीचा सुश्राव्य कार्यक्रम, पंडित हेमंत पेंडसे आणि सहकारी यांचा अभंगवर्षा हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, ग्रामगीता प्रचारक ह.भ.प. डॉ. बी.आर. विघे गुरुजी, नरखेड, जि. नागपूर, यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अभंगवाणी व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहेसकाळच्या सत्रात ग्रामगीता प्रचारक ह.भ.प. श्री. गुणवंतराव दवंडे,  ह.भ.प. डॉ. वेणुनाथ महाराज वेताळ, अहमदनगर, ह.भ.प. श्री. नामदेव महाराज लबडे, पंढरपूर, ह.भ.प. श्री. नारायण महाराज उत्तरेश्‍वर-पिंपरीकर व ह.भ.प.श्री.बाळू महाराज गिरगावकर, परभणी यांची सुश्राव्य कीर्तने होतील.
संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 720 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने रविवार, दि.27 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होऊन त्यानंतर घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे.
अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील कराड आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.

Post a Comment

 
Top