Add

Add

0
पुणे :-‘नेचर क्युअर नॅचरोपॅथी क्लिनीक’च्या वतीनेनिसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. सोनाली हरीश घोंगडे यांचे ‘निसर्गोपचार ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान विनामूल्य असून ते शुक्रवार, दिनांक 9 डिसेंबर 2016 रोजी ‘वेदशास्त्रोत्तेजक सभागृह’, सदाशिव पेठ, पुणे येथे दुपारी 12 ते 3 हया वेळेत होणार आहे. 
व्याख्यानामध्ये डॉ. सोनाली घोंगडे ‘औषधांपासून लांब कसे रहावे’, ‘आपल्या प्राचीन काळातील निसर्गोपचार आणि आहार’ या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. 
‘महाराष्ट्र निसर्गोपचार मंडळ’ आणि आएनओ या संस्थांच्या डॉ. सोनाली घोंगडे सदस्या आहेत. या संस्था ‘गोळ्या -औषधांपासून सुटका होण्यासाठी आहार हेच औषध आहे’, असा शास्त्रोक्त मार्गदर्शनाचा प्रसार करतात.
डॉ. सोनाली घोंगडे या गेली तेरा वर्षे सोलापूर येथे निसर्गोपचार क्षेत्राचा अभ्यास करीत असुन, त्यांना 2015 -16 या वर्षाकरीता निसर्गोपचार क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल आय.एन.ओ. (International Organisation of Naturopathy) या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांचे सोलापूर मधील भवानी पेठ येथे ‘नेचर क्युअर नॅचरोपॅथी क्लिनीक’ आहे. डॉ. सोनाली घोंगडे यांनी सेवा दिलेले सुमारे 20 हजार रूग्ण औषधमुक्त झाले आहेत. 

Post a Comment

 
Top