Add

Add

0
                                 ए.के के न्यु लॉ अ‍ॅकॅडमी च्या वतीने ‘संविधान दिन’ साजरा

पुणे ( प्रतिनिधी ):-‘भारतीय राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. तिचा आदर व पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे.’ असे मत  अ‍ॅड.डॉ. सुधाकरराव ई. आव्हाड यांनी काढले. ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘ए.के के न्यु लॉ अ‍ॅकॅडमी’ व पीएच.डी. रिसर्च सेंटर, पुणे आणि एम. सी ई. सोसायटीच्या इतर विविध शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी ‘संविधान दिन’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. सुधाकर ई. आव्हाड (नामवंत विधिज्ञ आणि माजी अध्यक्ष, बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा) बोलत होते. तर एम.सी ई. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी एम. सी ई. सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम व आय.पी. इनामदार (ए.के के न्यु लॉ अ‍ॅकॅडमी व पीएच.डी. रिसर्च सेंटर, पुणे च्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे मेंबर), डॉ. मोरेश्‍वर कोठावदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस जेसिन्टा बॅस्न्टिन यांनी केले तर डॉ. मोरेश्‍वर कोठावदे यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना डॉ. अ‍ॅड. सुधाकरराव ई. आव्हाड म्हणाले, ‘राज्यघटना म्हणजे व्यक्तीला राष्ट्राने व्यक्ती म्हणून यथोचित जीवन जगण्याचा दिलेला अधिकार होय. भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगाने गौरवलेली घटना असून, तिचा आदर व पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे.’  
पी. ए. इनामदार म्हणाले, प्रत्येक भारतीयाला भारतीय राज्यघटनेने काहीही ना काही दिले आहे. त्याबाबत प्रत्येक नागरिकाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी निर्भयता, स्पष्ट वक्तेपणा, खरेपणा याआधारांवर भारतीय राज्यघटना जपली पाहिजे व तिच्यात योग्य, समोयोचित व केवळ निकडीचे बदल घडवून आणले पाहिजेत. कायद्याचे राज्य अधिक बळकट कसे होईल यादृष्टीने प्रयत्नशील राहिले पाहिजे. 
डॉ. रशिद शेख (प्राचार्य, ऐ.के.के. न्यु.लॉ. अ‍ॅकॅडमी व अधिष्ठाता विधी विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ) यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. ते म्हणाले, ‘संविधान हा राष्ट्राचा आत्मा असून, अनेकविध अभ्यासू नेत्यांच्या अथक प्रयत्नांतून आपल्या देशाला ही राज्यघटना प्राप्त झाली आहे. या विषयावरील डॉक्युमेंटरी दाखविली. विद्यार्थ्यांना राज्यघटनेची जडणघडण कळावी व त्यांचा घटनेबाबतचा आदर वृध्द्रिंगत व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top