Add

Add

0
कोथरूड व्यक्तीच्या पारमार्थिक उन्नतीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य देणे हे `सनातन संस्था कोल्हापूर' या संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह उपरोक्त उद्देशाने 'सनातन संस्था कोल्हापूर ' विविध उपक्रम राबवते. यामध्ये समाजसाहाय्य अंतर्गत `विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरे, तणावमुक्ती व व्यसनमुक्ती यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृक्षारोपण, विविध शैक्षणिक उपक्रम, दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध स्तरांमधील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, कपडे वाटप, अन्नदान, फळेवाटप' आदि विविधांगी सामाजिक कार्य करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून कोथरूड परिसरामध्ये वृद्धांसाठी योग शिबिर आणि मंदिर स्वच्छता उपक्रम घेण्यात आले.

कर्वेनगर मधील साईबाबा मंदिराची स्वच्छता !

सध्याच्या धकाधकीच्या काळात मनाला शांती आणि आनंद देणारे ठिकाण म्हणचे मंदिर ! मंदिरे म्हणजे समाजाला चैतन्य पुरवणारे स्रोत असल्याने मंदिरांतील सात्विकता टिकून राहण्यासाठी मंदिरांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक ठरते. मंदिरातील गाभाऱ्याची नियमित स्वच्छता होत असते तरीही महिन्यारून एकदा मंदिराची संपूर्ण स्वच्छता करणे आवश्यक असते. याच अनुषंगाने 21 नोव्हेंबर या दिवशी ‘सनातन संस्था कोल्हापूर’च्या वतीने येथील साईबाबा मंदिराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सौ. मीनल मनमाडकर, सौ. सेलूकर यांसह २ जणींनी उत्स्फुर्तपणे मंदिराची संपूर्ण स्वच्छता केली. 

Post a Comment

 
Top