Add

Add

0
             अष्टांग योग परिवारच्या वतीने रविवार दि. 18 रोजी सणस मैदानात "योगाथॉन"चे आयोजन
पुणे (प्रतिनिधी):-  स्मार्ट सिटी पुणे ..हेल्दी सिटी पुणे साठी  सणस मैदानात "योगाथॉन"चे आयोजन अष्टांग योग परिवारच्या वतीने रविवार दि.18 डिसें. 2016 रोजी सकाळी 6 वाजता  पुणे येथील सणस मैदानात करण्यात आले असून "स्वच्छ पुणे ..स्वस्थ पुणे..हिरवे पुणे "या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती  अष्टांग योग परिवारच्या वतीने योगाचार्य संत श्री .शिवकांत (भीष्माचार्य ) यांनी दिली.
  योगॅथॉन या उपक्रमाचा मुख्य हेतू " "स्वच्छ पुणे ..स्वस्थ पुणे..हिरवे पुणे "हा असून "योगाथॉन"म्हणजे दैविक ऊर्जा,प्राणिक ऊर्जा ,आत्मप्रचिती, प्रकृती  ,मानवांमधील संचाराची ओळख करून देण्याचे व मानवाकडून करवून घेण्याचे  प्रात्यक्षिक आहे. योगाथॉन मध्ये  स्वता संत शिवकांत (भीष्माचार्य ) प्रात्यक्षिके देणार आहेत. 
  योगाथॉन म्हणजे काय ? व कश्यासाठी ?
    योगॅथॉन म्हणजे  ब्रम्हांड (आकाश,+वायू +अग्नी +पाणी +पृथ्वी ) होय .आणि दुसरे ब्रम्हाण्ड म्हणजे  प्रत्येक व्यक्तीचे शरीर होय.आपले शरीर हे "पंच महाभूत" आहे आणि शरीर हे एक ब्रह्मांड आहे.आपले शरीर रुपी ब्रह्मांड  आणि मूळ ब्रह्मांड मध्ये जे योग आहेत ,संवाद म्हणजे  योग तो प्राणवायू (ओक्षिजन )..प्राणवायूचा स्वाद काय आहे त्याचे प्रात्यक्षिक योगाथॉन या कार्यक्रमात करणार व कारविणार आहोत. 
  योगाथॉनचा मुख्य उद्देश :-
   देशातील विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि प्रामुख्याने तरुणांसाठी शारीरिक स्वस्थ,मानसिक जागरूकता,बौद्धिक क्षमता ,रचनात्मक ,भावनात्मक  गुणवत्ता विकास ,आध्यात्मिक चेतना  आणि सर्वागींण विकास साधने ,देशातील तरुणांमध्ये नवचेतना निर्माण करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे आणि तत्पर राहणे हाच योगाथॉन उपक्रम पुणे येथे राबविण्याचा खरा उद्देश आहे.
    देशातील ज्येष्ठ लोकांसाठी शरीर ,हृदय ,सूक्ष्मइंद्रिय  व त्याद्वारे एक प्लॅटफॉर्म कसा तयार करणार हे मुख्य सूत्र "योगाथॉन" मध्ये प्राप्त होणार आहे.
योगाथॉन हा अष्टांग योग वर आधारित एक "योगोत्सव " कार्यक्रम आहे.ज्याचा मुख्य उद्देश .." स्वास्थ .."स्वच्छता ..शुद्धतता  आणि सशक्त राहण्याची कला  पूर्ण रूपाने देतो .
  "योगाथॉन"चे  ब्रीद वाक्य आहे"स्वच्छ पुणे .. स्वस्थ पुणे..हिरवे पुणे "..पुणे शहरातील बहुसंख्य शाळा,कॉलेज चे विद्यार्थी,पुणे महानगरपालिकेच्यासर्व उद्यानातील सजग नागरिक ,भारती विद्यापीठ ,वाकिंग प्लाझा ,तळजाई माथा ,सारसबाग उद्यान, महाराणा प्रताप उद्यान,साठे उद्यान,पुणे शहरातील हास्य क्लबचे सदस्य या उपक्रमात सहभागी होणार आहेत.या उपक्र मासाठी 5000लोकांची उपस्तिती अपेक्षित आहे.जनतेने या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.हा उपक्रम सर्वानसाठी मोफत असून त्यासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.मोफत प्रवेशिकांसाठी कृपया पुढील इमेल वर त्वरित संपर्क साधावा ..
santsheokant@gmail.com,Aniket-8888391433, Pappu kandhare -9765455011/ 902934-379 .

Post a Comment

 
Top