Add

Add

0
  हिंजवडी(प्रतिनिधी):- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त नेरे येथे नेरे ग्रामस्थ व मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने कीर्तन महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हभप निवृत्ती महाराज देशमुख, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, हभप कृष्णाजी पडवळ (मुळशी), हभप संतोष महाराज पायगुडे (मांडवी), हभप सुप्रियाताई साठे (चिंचवड), हभप सतीश काळजे (चऱ्होली) यांची कीर्तनसेवा होणार आहे. 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  

        तसेच 13 डिसेंबर रोजी माजी खासदार नाना नवले, माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश ढमाले, माजी सभापती तुकाराम हगवणे यांना जीवन गौरव पुरस्कार, तर हभप मुक्ता वेळगावकर, हभप अरुण महाराज येवले, हभप सुखलाल महाराज बुचडे, हभप जीवनमामा खाणेकर याना संप्रदाय भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यासह विविध क्षेत्रातील 80 मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.  बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास पायगुडे, पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, सचिन शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.  

Post a Comment

 
Top