Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):- जाणीव युवा या सेवाभावी संस्थेच्या वतीने तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी दि.09 ते 11 डिसेंबर 2016 या कालावधीत निवासी 'मानव निर्माण शिबीर' आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे हे सहावे वर्ष आहे. वंचित विकास संस्थेच्या वडगाव शिंदे (लोहगाव) येथील 'निहार' संस्थेत होणार आहे. 

कीर्तनकार व प्रबोधनकार चारुदत्त आफळे (व्यक्तीच्या अंतर्बाह्य विकासाठी मानव निर्माण), अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील (भारतीय अर्थक्रांती), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास चाफेकर (सामाजिक कार्यात युवकांचे योगदान), सायबर तज्ज्ञ एड. जयश्री नांगरे (सायबर सुरक्षा), सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर (ग्राहक हक्क आणि युवक), किशोरी गद्रे (सुखी आयुष्यासाठी संशोधनात्मक दृष्टिकोन), पत्रकार हालिमा कुरेशी (सामाजिक सलोखा), श्रीकांत गबाले (संवाद कौशल्ये) हे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.
जाणीव युवा तरुणांनी सुरु केलेली सेवाभावी संस्था आहे. व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण, आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम संस्थेच्या वतीने घेतले जातात. गणेशोत्सवात पोलीस मित्र, आषाढी वारीमध्ये स्वयंमसेवक म्हणून तरुणाचा गट कार्य करतो. तरुणात सामाजिक जाणीव जोपासावी, यासाठी २०१० पासून मानव निर्माण शिबीर घेतले जाते.
शिबिरात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्रीकांत गबाले (96233558539),कौस्तुभ वर्तक 8446250782 व सायली शिर्के (7038797938) यांच्याशी संपर्क करावा.

Post a Comment

 
Top