Add

Add

0

वडगाव मावळ (प्रतिनिधी):- मावळ तालुक्यातील लायन्स क्‍लब ऑफ वडगावतर्फे मावळ व पुणे जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी राबविलेला व यशस्वी ठरलेला मावळ पॅटर्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. त्यांनी क्‍लबच्या कार्याचे कौतुक केले. 

आमदार बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्‍लबने राबविलेल्या उपक्रमाद्वारे तालुक्‍यातील कुपोषित बाल कांना सकस आहार व औषधे पुरविण्यात आले. हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प क्‍लबने केला आहे. कुपोषणमुक्तीचा ‘मावळ पॅटर्न’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. त्या वेळी आमदार भेगडे, लायन्स क्‍लब प्रांत -323 डी-2 च्या कुपोषणमुक्त पुणे जिल्ह्याचे प्रांतप्रमुख भूषण मुथा, वडगाव लायन्स क्‍लबचे संस्थापक.दामोदर भंडारी,अध्यक्ष आदिनाथ ढमाले, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर, झुंबरलाल कर्नावट उपस्थित होते. मुथा यांनी उपक्रमाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यांनी क्‍लबच्या कार्याचे कौतुक केले. 

कुपोषणाचा मावळ पॅटर्न राज्यातही राबविणार आहे. पॅटर्नचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला.
- भूषण मुथा, प्रांतप्रमुख, 
लायन्स क्‍लब प्रांत -323 डी -2.

असा आहे ‘मावळ पॅटर्न’
  • संकल्पना : मावळ पंचायत समितीचा एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग व लायन्स क्‍लब ऑफ वडगाव
  • कालावधी : 2015-16 या वर्षी तालुक्यात कुपोषणमुक्त मावळ अभियान 
  • तालुक्‍यातील कुपोषित बालके : 239
  • बालकांचा खुराक : गूळ, गावरान तूप व शेंगदाणा लाडू दररोज 2 ते 3. एक सफरचंद किंवा केळी, राजगिरा लाडू, उकडलेले बटाटे, खजूर 
  • आरोग्य सुविधा : आवश्‍यक औषधे मोफत, बालकांची नियमित आरोग्य तपासणी व पालकांचे समुपदेशन
  • अभियानाचा परिणाम : सर्व मुले कुपोषणमुक्त
  • अधिकाऱ्यांच्या मते : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी अभियानाला कुपोषणमुक्तीचा मावळ पॅटर्न असे संबोधून जिल्ह्यातही तो राबविण्याची सूचना
  • क्‍लबची भूमिका : जिल्ह्यातील एकवीसशे कुपोषित मुलांसाठी असाच उपक्रम

Post a Comment

 
Top