Add

Add

0

पुणे (प्रतिनिधी):-नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून ‘कॅशलेस ईकॉनॉमी’ या विषयाची चर्चा खूपच रंगू लागली आहे. कॅशलेस ईकॉनॉमी म्हणजे रोख पैश्यासह व्यवहार करणे बंद ! डेबिट, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, ई-वॉलेट या माध्यमांतून सगळे व्यवहार होणार. कॅशलेस ईकॉनॉमीचा फायदा असा की तुम्हाला पैसे जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. भारतामध्ये देखील ही पद्धती लागू करता येईल का यावर विचार सुरु आहे आणि ती प्रत्यक्षात लागू करण्याच्या दिशेने प्रयत्न देखील सुरु करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे त्याची सुरुवात झाली आहे ‘गोवा’ राज्यापासून! गोवा हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे जे पूर्णत: कॅशलेस ईकॉनॉमीवर व्यवहार करेल.

नवीन वर्षाच्या पहाटेपासून गोव्यामध्ये ही पद्धती लागू होईल असे गोवा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2017 पासून गोव्याच्या रहिवाश्यांना आणि तेथील पर्यटकांना सोबत पैसे घेऊन फिर ण्याची गरज पडणार नाही, त्यांना हव्या त्या गोष्टीचा ते लाभ घेऊ शकतात आणि पैसे थेट त्यांच्या बँक खात्यातून कापले जातील. मुख्य म्हणजे तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तरी साध्या फोनवरून *99# डायल करून तुम्ही वस्तू खरेदी करू शकता आणि इतर व्यवहार पार पाडू शकता.
या निर्णयासह गोव्यामध्ये रोख पैश्यांच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे असे मुळीच नाही. काही किरकोळ वस्तूंच्या व्यवहारांसाठी रोख पैश्यामध्ये व्यवहार सुरु असतील, परंतु लोकांनी कॅशलेस पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा यासाठी सरकारतर्फे त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
येणाऱ्या काळात गोवा १०० टक्के कॅशलेस राज्य म्हणून पुढे आले तर त्यात नवल वाटायला नको !

Post a Comment

 
Top