Add

Add

0

 
कोथरूड (पुणे) - ज्ञानदान जरी सर्वांत श्रेष्ठ असले, तरी ते सूक्ष्मातील असल्याने त्याचे महत्त्व बहुतेकांना कळत नाही. याउलट ‘दिलेले अन्न’ हे स्थूलचक्षूंनी दिसत असल्याने त्याचे महत्त्व बर्‍याच जणांना जाणवते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण होण्यासाठी गरजूंना साहाय्य करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने 30 नोव्हेंबर या दिवशी येथील ‘सावली’ संस्थेतील मतीमंद आणि बहुविकलांग मुलांना खाऊवाटप करण्यात आले. संगीता दाभोलकर, कुमुद मालेवार, तेजस दीक्षित, ओंकार कुलकर्णी यांसह 30 दिव्यांग मुलांनी याचा लाभ घेतला. या वेळी ‘सावली’ संस्थेच्या प्रमुख सौ. गौरी कुलकर्णी; तसेच सौ. संगीता लाठे, मंदा पारेकर यांचे सहकार्य लाभले. सौ. गीता देशपांडे आणि सौ. शर्मिला निमकर यांनी उपक्रमाचे संयोजन केले होते.
'धर्मसेवा प्रतिष्ठान' न्यासाच्या वतीने सामाजिक जाणिवेतून अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आजच्या  धावपळीच्या युगात मानवाला त्याच्या सामाजिक जाणिवेचे भान रहावे, यासाठी न्यासाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध  सामाजिक उपक्रमांमध्ये लोकसहभाग कसा वाढेल, या अनुषंगाने देखील प्रयत्न केले जातात. न्यासाच्या वतीने गरीब मुलांसाठी, 

गरजूंसाठी अन्नदान,गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे विनामूल्य वाटप,विनामूल्य आरोग्य तपासणी,  लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी बालसंस्कार वर्ग, मंदिर स्वच्छता,आदी अनेकविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येते.या कार्याला समाजातीलमान्यवरांचे कौतुक व पाठबळ लाभते आणि  यामुळे न्यासाच्या कार्यकर्त्यांना कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते.

Post a Comment

 
Top