Add

Add

0
               जिल्हा परिषदेच्या स्थायीच्या बैठकीत मान्यता
पुणे (प्रतिनिधी ):-
मुळशी जलाशयात वाघवाडी येथे एक नवीन लोखंडी प्रवासी मोटार लाँच दाखल होणार आहे. याबाबतची मान्यता जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आली. 
मुळशी जलाशयातील जिल्हा परिषदेच्या मालकीची कार्यरत असणारी प्रवासी 'मोटार लाँच' गेली 9 ते 10 वर्ष जुनी जीर्ण झालेली आहे. सतत पाण्यात राहिल्याने लाँचचा तळाकडील लोखंडी भाग गंजून छिद्रे पडलेली आहेत. तसेच त्यामधून लाँचचे आत पाणी येत असल्याने लाँच प्रवासी वाहतुकीस धोक्याची झाली आहे. लाँचचे इंजिन जुने झाल्याने सतत नादुरुस्त होत आहे. त्यामुळे दुरुस्तीस मोठय़ा प्रमाणात खर्च होणार असल्याने जुनी लाँच दुरुस्त करूनही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून 30 मे 2016 पासून लाँच बंद ठेवण्यात आली आहे. 
दरम्यान, तेथील नागरिकांची वाहतुकीची गैरसोय होऊ नये, यासाठी कुंभेरी येथील टाटा कंपनीने पुरवठा केलेली प्रवासी लाँच तात्पुरती वापरण्यात येत आहे. त्यामुळे मुळशी जलाशयातील वाघवाडी वडगाव येथील जुन्या लाँचच्या ठिकाणी नवीन प्रवासी लाँच खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच मुळशी जलाशयात नवीन प्रवासी लाँच दाखल होणार असून, नागरिकांची ये-जा करण्याची समस्या मिटणार आहे. सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा नियोजन समितीकडून नदी-धरणांतर्गत जलवाहतूक सुरू करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. 

Post a Comment

 
Top