Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):-"विज्ञानाने अगदी अनादि काळा पासून विविध शोध लावत झेप घेतली आहे. अश्व युगापासून मानवाने तंत्रज्ञानात अफाट प्रगती केली. ज्या काळात संशोधकांना पुरेशी साधनसमुग्री उप लब्ध नव्हती. त्यावेळी मोठमोठे अभूतपूर्व शोध लागले .आज आधुनिक तंत्रज्ञान हाती असतानाही आजचा युवक वर्ग मानसिक गुलामगिरीमध्ये अडक लेला दिसतो. युवकांनी केवळ विज्ञानाचे उपभोक्ते न होता विज्ञानाची दृष्टी जोपसली पाहिजे. तरच येत्या दशकात आपला देश संशोधनात पुढे जाईल,"असे मत भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर येथिल शास्त्रज्ञ संतोष टकले यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात 'विश्वाचे अंतरंग' या विषयावर ते बोलत होते. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे पुणे शाखा अध्यक्ष यशवंत घारपुरे, सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम्. एम्. सावळे, एन. टि. कासार आदी उपस्थित होते.
टकले म्हणाले, "जन्मजात प्रत्येकाला वैज्ञानिक दृष्टी असते. मात्र त्याला प्रोत्साहन न मिळाल्यामुळे आपल्याकडे अनेकांचे कौशल्य पुढे येत नाही. बुवाबाजी आणि कर्मकांडाच्या भोवर्यट विज्ञान अडकले आहे. आपण विज्ञानाची सृष्टि घेतली पण दृष्टी नाही. आज सर्वत्र जाती धर्मावर काथ्या कूट करतांना पाहतो, यातून अधोगती होईल."
यशवंत घारपुरे यांनी संतोष टकले यांच्या विज्ञानप्रसार कार्याची सविस्तर माहिती दिली.  तसेच विज्ञान परिषदेच्या कार्यबद्दलची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली.
यावेळी सावळे म्हणले, "जग खुप पुढे गेले आहे. याला बहुतांशी वैज्ञानिक प्रगती हे मुख्य कारण आहे. आपण विज्ञान क्रांतीचे उपभोक्ते आहोत. संतोष टकले यांनी साध्या सोप्या भाषेत ते आज मांडले, याचा सर्वांना फायदा होईल. विशेषत विद्यार्थ्यांना ते अधिक उमगले."

यानंतर प्रोजेक्टरवर टकले यांनी आकाशगंगा, ग्रहतारे, अवकाशाची निर्मिती, सौर उर्जेची निर्मिति, भारतीय शास्त्रज्ञाचे प्रयत्न अशा अनेक कुतुहलांविषयी उपस्थित सर्वांना माहिती दिली. विद्यार्थी आणि सहभागी सर्व विज्ञानप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. यशवंत घारपुरे यांनी प्रास्ताविक केले. सुनिल पोटे यांनी सूत्रसंचालन केले. एम्. एम्. सावळे यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top