Add

Add

0
 पुणे (प्रतिनिधी):- भारतातील सुमारे 22 कोटी लोकांचे श्रद्धास्थान असलेले जगतगुरु श्री रविदास महाराज यांच्या पुणे स्थित मंदिराची स्थापना 7 डिसें बर 2002 रोजी झाली असून या मंदिराला `तिसरे धर्मस्थान' असा सन्मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे.या वर्षी या मंदिराच्या तेराव्या वर्धापनादिनाचा सोहळा मोठ्या थाटात,7 डिसेंबर2016६ रोजी संपन्न होणार आहे.हा समारंभ जगतगुरू श्री रविदास महाराज मंदिर ,तिसरे धर्मस्थान,शिवशंभो नगर,गल्ली क्रमांक 2, कात्रज-कोंढवा रोड,कात्रज,पुणे-46. येथे संपन्न होणार आहे.यावेळी येथे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील.
वर्धापनदिनाच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच 6 डिसेंबर 2016रोजी समाजातील महिला व तरुण यांची सामा जीक,शैक्षणिक,आर्थिक प्रगती साधण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. अनेक विषयातील तज्ज्ञ लोक दिवसभराच्या व्याख्यानातून मार्गदर्शन करणार आहेत. देशाच्या विविध राज्यातून येथे अनेक लोकांचा सहभाग लाभणार आहे.
भव्य शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण (1लाख लोकांचा जनसमुदाय)...
7 डिसेंबर रोजी  सकाळी 8 ते 11.00 वाजता कात्रज चौक ते जगतगुरु संत रविदास मंदिर, तिसरे धर्मस्थान दरम्यान अशा भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून या शोभा यात्रेत समाजाचे संत, महात्मे व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. यावेळी सुमारे 1 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्याचे आकर्षण-शहीद 108 संत श्री रामानंदजी महाराज स्तंभ
जगतगुरु रविदास महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी 2003 मध्ये पुणे येथील कात्रजच्या डोंगरावर दोन एकर जागेत तिसNया धर्मस्थानाची भव्य स्थापना करण्यात आली. या प्रकल्पाच्या पाचही टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून त्यात सत्संग हॉल, मुख्य मंदिर, भोजन हॉल, अतिथीगृह, ध्यान मंदिर, संत निवास, हॉस्पिटल हॉल, स्वयंपाकघर, श्री.रविदास महाराज प्रवेशद्वार व पुणे शहराचे आकर्षण असणारा अष्ट कोनी आकाराचा, जमिनीपासून 75फूट उंचीवर असणारा जगतगुरू श्री रविदास यांचे भक्त शहीद 108 संत श्री रामानंदजी महाराज स्तंभ आदींचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून या अद्भूत स्तंभावर श्री.रविदास महाराजांची अमृतवाणी कोरली आहे. त्याचबरोबर जगतगुरू श्री रविदास महाराजांच्या मूर्तीवर 3 किलो सोने व चांदीचे छत्र तसेच हार, मुकुट व 1 किलो चांदीच्या पादुका आहेत.या ऐतिहासिक कार्यासाठी अखिल भारतीय रविदासिया धर्म संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष व जगतगुरु श्री रविदास मंदिर, तिसरे धर्मस्थानचे प्रमुख संत श्री सुखदेवजी महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. या भव्य दिव्य अशा धर्मस्थान प्रकल्पाला अनेक सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांनाही मोलाचे सहकार्य केले आहे. 

Post a Comment

 
Top