Add

Add

0
                 

पुणे :-रविदासिया समाजाच्या भव्य शोभा यात्रेला प्रचंड प्रतिसाद लाभला असून या यात्रेत देशाच्या अनेक राज्यातून रविदासिया समाजाचे संत, महात्मे व समाज बांधव प्रचंड संख्येने सामिल झाले होत. पुणे येथील कात्रज चौक ते संत रविदास मंदिर, तिसरे धाम, कोंडवा रोड असा या शोभा यात्रेचा मार्ग होता. आज (7 डिसेंबर2016) सकाळी 9 ते दुपारी 12 सुमारास ही शोभा यात्रा संपन्न झाली.येथील जगतगुरु श्रीरविदास महाराज यांच्या भव्य मंदिाराच्या 13व्या वर्धापनदिनानिमित्त या शोभा यात्रेचे आयोजन मंदिराचे प्रमुख संत श्री सुखदेवजी वाघमारे महाराज यांनी केली होते. विविध राज्यातून आलेल्या भक्तांनी भजन गात, पारंपारिक नृत्य करित या यात्रेत भाग घेतला. यामुळे पुण्याचा संपूर्ण कात्रज परिसरच आनंद व उत्साहाने चिंब झाल्याचे दिसत होते.
भारतातील सुमारे 22 कोटी लोकांचे श्रद्धास्थान असलेले जगतगुरु श्री रविदास महाराज यांच्या पुणे स्थित मंदिराची स्थापना 7डिसेंबर 2003 रोजी झाली असून या मंदिराला`तिसरे धाम' असा मान आहे.
काल (6डिसेंबर-2016) वर्धापनदिनाच्या 1दिवस अगोदर समाजातील महिला व तरुण यांची सामाजीक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती साधण्यासाठी तज्ज्ञांनी मंदिराच्या सभा मंडपात दिवसभराच्या व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

जगतगुरु रविदास महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी-2003मध्ये पुणे येथील कात्रज च्या डोंगरावर दोन एकर जागेत सदगुरु रविदास मंदिर, तिसरे धर्मस्थानाच्या भव्य वास्तूची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पाच्या पाचही टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून त्यात सत्संग हॉल, मुख्य मंदिर, भोजन हॉल, अतिथीगृह, ध्यान मंदिर, संत निवास, हॉस्पिटल हॉल, स्वयंपाकघर, श्री  रविदास महाराज प्रवेशद्वार व पुणे शहराचे आकर्षण ठरणारा अष्टकोनी आकाराचा, जमिनीपासून 75 फूट उंचीवर असणारा जगतगुरू श्री रविदास यांचे भक्त शहीद 108संत श्री रामानंदजी महाराज स्तंभ आदींचे बांध काम पूर्णत्वास गेले असून या अद्भूत स्तंभावर श्री रविदास महाराजांची अमृतवाणी कोरली आहे. त्याच बरोबर जगतगुरू श्री रविदास महाराजांच्या मूर्तीवर 3किलो सोने व चांदीचे छत्र तसेच हार, मुकुट व 1 किलो चांदीच्या पादुका आहेत.या ऐतिहासिक कार्यासाठी अखिल भारतीय रविदासिया धर्म संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष व जगतगुरु श्री रविदास मंदिर, तिसरे धर्मस्थानचे प्रमुख संत श्री सुखदेवजी महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. या भव्य दिव्य अशा धर्मस्थान प्रकल्पाला अनेक सामाजिक बांधिलकी जपणाNयांनीही मोलाचे सहकार्य केले आहे.

Post a Comment

 
Top