Add

Add

0
                         9 आणि 10 डिसेंबर रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे:-‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसाय टी’ च्या ‘एच.जी.एम.आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन ,’ पुणे आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आहे. ही परिषद दिनांक 9 आणि 10 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘हाय टेक हॉल’, आझम कॅम्पस येथे होणार आहे. परिषदेचे उद्घाटन एम.सी.ई.सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या हस्ते होईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. भूषण पाटील (‘एच.जी.एम. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन,’) यांनी दिली.
‘इक्वीटी अ‍ॅण्ड क्वालिटी इन हायर एज्युकेशन : इन प्रिसपेक्टिव्ह ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी 2016’ (Equity and Quality in higher education : in perspective of new education policy) हा या परिषदेचा विषय आहे. या परिषदेमध्ये डॉ.आर.एस.कोठारी, डॉ.गौरव सिंग, डॉ. आदित्य अभ्यंकर, शरद जावडेकर, स्वाती चाटे मार्गदर्शन करणार आहेत. उषा परदेशी या परिषदेच्या समन्वयक आहेत. 

Post a Comment

 
Top