Add

Add

0
महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन.. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंच्या हस्ते
 नागपूर(प्रतिनिधी):- एक छायाचित्र हे हजार शब्दांचे काम करते, असे म्हटले जाते. म्हणूनच महाराष्ट्राची संस्कृती, कला, प्राचीन व ऐतिहासिक वारसा, पर्यटन आणि विकसित होणाऱ्या महाराष्ट्राचे दर्शन छायाचि त्राच्या माध्यमातून व्हावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने महाराष्ट्र माझा ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे नागपूरातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने स्व. वसंतराव देशपांडे सभागृह परिसरातील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
            या कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, विधान सभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, संचालक देवेंद्र भुजबळ, शिवाजी मानकर उपस्थित होते.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सप्टेंबर 2016 मध्ये  महाराष्ट्र माझाराज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेकरिता राज्यभरातून एकूण 3 हजार 600 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. यापैकी निवडण्यात आलेल्या 201 उत्कृष्ट छायाचित्रांमधून 130 छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात आली आहेत.
            या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील गड-किल्ले, कला-संस्कृती, वन पर्यटन, शेती विकास, औद्योगिक विकास आणि प्रगत महाराष्ट्रा सोबतच शासनाच्या जलयुक्त शिवार व इतर योजनांवर आधारित छायाचित्रे ठेवण्यात आली आहे. यात प्रथम क्रमांक प्राप्त देवदत्त कशाळीकर यांचे  राज्य स्वराज्याचे... सर्वधर्म समभावाचे, विद्याधर राणे यांचे व्दितीय क्रमांक प्राप्त मुलगा-मुलगी एक समान, दिनेश भडसाळे यांचे जरा याद करो कुर्बानीया तृतीय क्रमांक छायाचित्रांचा समावेश आहे. तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त छायाचित्रासोबतच अनेक बोलकी व लक्षवेधक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. सदर प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत 15 डिसेंबरपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, छायाचित्रकार, पत्रकार व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाने केले आहे.        

Post a Comment

 
Top