Add

Add

0
पुणे :-'माय अर्थ' आणि 'एन्व्हायमेंट क्लब ऑफ इंडिया' ने नदी प्रदुषण थांबविण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरूवात अलिकडेच ‘एक दिवा नदीसाठी माझ्या मुठाईसाठी’ हा कार्यक्रम घेऊन केली. परंतु संस्थेच्या अनेक दिवसांच्या अभ्यासा नुसार नदी प्रदूषित होण्यापासुन थांबवायची असेल तर प्रथम नाले व ओढे, कचरा आणि प्रदूषण मुक्त करणे गरजेचे आहे. त्या अनु षंगाने पंधरा वर्ष जुना आंबिल ओढा स्वच्छ करण्याची मोहिम सुरू करण्यात येणार आहे.
या मोहिमेतंर्गत सर्व नागरिक,गणेशउत्सव मंडळे यांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘माय अर्थ’ व ‘एन्व्हायमेंट क्लब ऑफ इंडिया’ च्या वतीने करण्यात आले आहे. 
आंबिल ओढा ह्या ऐतिहासिक नाल्याची परस्थिती खूप दयनीय आहे. अंदाजे 10 ते 15 वर्षा पुर्वीचा नाला आज गटार म्हणून वाहत आहे.प्रशासन,नगरसेवकांचे याकडे लक्ष नाही.आर सी सी करून नाल्यातील जैवविवीधता संपली आहे.  पुणेक रांना नदी व पर्यावरण रक्षक म्हणून पुढे यावे लागणार आहे.
आंबिल ओढ्याच्या रक्षणार्थ सर्वसामान्य नागरिक, गणेशउत्सव मंडळे, सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन माय अर्थ आणि एन्व्हायमेंट क्लब ऑफ इंडिया संस्थेतर्फे करण्यात येत आहे. संपर्कासाठी 8482831108

Post a Comment

 
Top