Add

Add

0

                              नगरपालिका स्वबळावरच लढवणार-आमदार बाळा भेगडे 


पुणे(प्रतिनिधी):- राज्यातील दुसर्‍या टप्प्यातील नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. या निवड णुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल पाहता जिल्ह्यात भाजपच्या बाजूचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी मुक्त करू, असा निर्धार भाजपचे जिल्हा अध्यक्ष व मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केला आहे. 
भाजपच्या कार्यालात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. 
भेगडे म्हणाले की,नगरपालिकेच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकांसाठी 14 डिसेंबरला मतदान होत आहे. जिल्ह्यातील 10नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपने आठ नगरपालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारामती आणि जुन्नर येथे स्थानिक आघाड्यांशी युती करून रिंगणात उतरणार आहे. 10नगरपालिकेतील 8 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे असून, बारामती व जुन्नर येथील नगराध्यक्ष भाजप पुरस्कृत आहे. भाजपचे स्वबळावर 151 नगरसेवक व भाजप पुरस्कृत 24 असे एकूण 175उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. नुकत्याच्या झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. सध्याला जिल्ह्यात भाजपमय वातावरण आहे. याचा फायदा या निवडणुकीत आम्हाला होणार आहे. तसेच 07नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
नगरपालिका स्वबळावरच लढवणार-आमदार बाळा भेगडे 
मंत्र्यांची फौज प्रचारालाजिल्ह्यातील 10नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमचा प्रय▪असणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत या मंत्र्यांसोबत अन्य कॅबिनेट व राज्यमंत्री प्रचाराला येणार असल्याचेही भेगडे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top